Maharashtra Assembly Election 2024 |जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मतदान जनजागृती
पालघर : पुढारी वृत्तसेवा
निवडणुक आयोगाकडुन विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ हा कार्यक्रम जाहिर झालेला असून त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील या विषयी स्थायी सुचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुक विषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP तालुकास्तरावर मोहिम राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये व विविध सोसायटीमध्ये मतदार नोंदणी शिबीर घेण्यात आली. त्याअन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ नंतर २९ ऑक्टोंबर २०२४ पर्यंत मतदार नोंदणीच्या संख्येत २,००,००० मतदारांची वाढ दिसून आली आहे. ही SVEEP Activity ची फलश्रुती आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-२०२४ करीता भारत निवडणुक निर्देशानुसार ३० आयोगाकडुन प्राप्त दिवसाच्या कालावधीमध्ये EVM² व VVPAT संदर्भात मोहीम राबविण्यात आली आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील निवड केलेल्या कॅम्पस अम्बेसिडर यांचे विद्यापीठ व महाविद्यालयातील निवडणूक साक्षरता मंडळाचे सक्षमीकरण व निवडणूक साक्षरता मंडळाकडून महाविद्यालयातील १८ वर्ष वयावरील मतदार नाव नोंदणी, निवडणूकीतील मतदान करण्यासाठी निवडणूक साक्षरता मंडळाकडून प्रचार, प्रसिध्दी इ. बाबत जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे वर्कशॉप घेण्यात आले आहे.
महाविद्यालयातील व्याख्यान
पालघर जिल्ह्यातील निवड केलेल्या महाविद्यालयांमध्ये निवडणूक साक्षरता मंडळांच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रकीयेसंदर्भात लोकशाही मुल्ये, निवडणूक, मतदान प्रक्रियेची ओळख करुन देणे व जनजागृती त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय व उच्च महाविदद्यालयांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
त्यामध्ये व्याख्याने, मतदार नोंदणीची शिबीर, परिसंवाद, विदयार्थ्यांचे पथनाट्य इ. उपक्रमांचा समावेश आहे. तसेच २१ते २६ ऑक्टोंबर या कालावधीत संकल्पपत्राची संकल्पना रावण्यिात आली असून जिल्ह्यातील ३०९५ शाळांना ६,४४,९५१ वाटप केलेले असून त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांकडूप परिपूर्ण प्रपत्र भरुन ६,३९,७६३ इतकी संकल्प पत्र तालुका स्तरावर प्राप्त झाली आहेत. पालघर जिल्ह्यात सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची रॅली व पालकसभेद्वारे मतदान करण्याचे आवाहन सर्व पालकशांना करण्यात आले आहे.
बॅनर्स, पोस्टर, स्टिकर्स, होर्डिंग, स्टैंडिंगमार्फत जनजागृती
पालघर जिल्हयातील सर्व मतदार संघामंध्ये नियुक्त केलेल्या Sveep नोडल अधिकारी व त्यांच्या टिम मार्फत सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी, बसस्टॅन्ड, रेल्वेस्टेशन, पोस्ट ऑफीस, बँका तसेच आठवडी बाजार, मॉल इत्यादी ठिकाणी सदर प्रसिध्दी साहित्याचा उपयोग करुन मतदारांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.

