

विरार शहराची जनसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. याचा परिणाम स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याचे चित्र दिसून येत आहे. सकाळी व संध्याकाळी लोक कामाला व परत कामावरून परत येत असल्याने स्टेशन परिसरात गर्दी व ट्रॅफिक जाम होत असल्याने येथील नागरिकांना गर्दीचा त्रास सहन करावा लागत आहे.
वाढती जनसंख्या व गर्दी लक्षात घेत विरार स्टेशनचे लवकरच एअरपोर्ट सारखे चित्र होणार आहे. हे काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन म्हणजेच एमआरविसीच्या एमयुटीपी ३ यांच्याद्वारे होणार आहे. त्याचबरोबर प्रवाशांच्या सुविधासाठी डेक, सरकता जिना (एस्केलेटर), लिफ्ट (एलीवेटर) एअरपोर्ट सारख्या सुविधा यांचा देखील समावेश आहे आणि स्टेशन परिसरातील बाहेरील जागा हे पूर्णतः साफ होईल व त्याचबरोबर स्टेशन परिसराची जागा देखील मोठी होणार आहे, परिणामी शहरातील लोकांना मोकळ्या जागेत येणे जाणे करण्यासाठी कोणती गैरसोय होणार नाही.
२८० बाय २५ मिटर आकाराचे उंच डेक याचा निर्माण केला जात आहे, जो फलाट क्रमांक २,३,४ आणि नवीन प्रस्तावित फलाट क्रमांक ५ याला जोडणार आहे. या डेक ला जोडण्यासाठी ४ एस्केलेटर आणि २ लिफ्ट बांधली जात आहे, त्याचबरोबर फलाट क्रमांक ५,६ आणि बुकिंग कार्यालयला जोडणारा एक नवीन एफओबी पण या डेकला जोडला जाणार आहे. या डेकवर १ बुकिंग ऑफिस आणि वसई विरार शहर महानगरपालिकाद्वारे प्रस्तावित ग्राउंड ३ बिल्डिंग देखील बनवली जाणार आहे, त्यामुळे शहरामधील लोकांना ऑटो रिक्षा ची सुविधा देखील भेटणार आहे.
सध्याच्या विरार प्लॅटफॉर्मवर दररोज प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याकारण एमआरविसी यांच्या वतीने ३ नव्या प्लॅटफॉर्मचे काम होणार आहे, त्यामध्ये एक दक्षिण पूर्व ज्या दिशेने, ६०० मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म होणार आहे, त्याचबरोबर दक्षिण पश्चिम त्या दिशेने ३३० मीटर लांब, तर उत्तर पश्चिम या दिशेने ३३० मीटर लांब असे प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येणार आहे. याचबरोबर प्रवाशांना सुविधासाठी प्लॅटफॉर्म संख्या ३ए आणि ४ए त्यांची उंची वाढविण्यास येणार आहे.
येणाऱ्या ५० वर्ष लक्षात घेत पश्चिम रेल्वे अनेक स्टेशनचे पुनर्विकासाचे काम करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रवाशांना होणाऱ्या गैरसोई पासून मुक्ती मिळेल आणि नागरिक वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर चा आनंद घेऊ शकतील.
- विनीत अभिषेक, सीपीआरओ, पश्चिम रेल्वे