Virar Fire: फटाक्यांच्या ठिणगीने विरारमध्ये कचऱ्याला आग; सुदैवाने जीवितहानी टळली

फटाक्याच्या ठिणगीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती; अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात
Virar Fire
Virar FirePudhari
Published on: 
Updated on: 

खानिवडे: दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी सुरू असतानाच वसई तालुक्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. नालासोपारा येथे फटाक्यांच्या ठिणगीमुळे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना भीषण आग लागल्याची घटना ताजी असतानाच, शनिवारी विरार पूर्वेकडील मनवेल पाडा तलाव परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

विरार पूर्वेकडील मनवेल पाडा तलावालगत असलेल्या मोकळ्या मैदानात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले होते. दिवाळीनिमित्त फटाके फोडले जात असताना त्यातील एका फटाक्याची ठिणगी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर पडल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काही वेळातच आगीने कचऱ्याच्या ढिगाऱ्यांना वेढा घातला.

Virar Fire
Navi Mumbai to Jeddah Flight: नवी मुंबई ते जेद्दा थेट विमानसेवा १५ डिसेंबरपासून; अकासा एअरची दररोज दोन उड्डाणे

घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीत कचऱ्याचे ढिगारे जळून खाक झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी अथवा अन्य मोठे नुकसान झाले नाही.

Virar Fire
Ram Purnekar Diwali Pahat Event: दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या परवानगीवरून राम पूर्णेकरांचा पोलिसांना सवाल

दरम्यान, दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे अशा आगीच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी मोकळ्या जागांमध्ये साचलेल्या कचऱ्याजवळ तसेच वाहनांच्या पार्किंग परिसरात फटाके फोडताना विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.