Vikramgad Manor road condition : विक्रमगड ते मनोर रस्त्याची अक्षरशः चाळण

खड्डे चुकवण्यासाठी वाहनचालकांना करावी लागते तारेवरची कसरत
Vikramgad Manor road condition
विक्रमगड ते मनोर रस्त्याची अक्षरशः चाळणudhari photo
Published on
Updated on

मोखाडा: आज घडीला मोखाडा खोडाळ जव्हार विक्रमगड या भागातील लोकांना पालघर जिल्हा मुख्यालय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या विक्रमगड ते मनोर या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता चल गावाकडे चल माझ्या दोस्ता या कवितेवरून खड्ड्यांचा तुडवीत रस्ता चल पालघर मुख्यालयाला दोस्ता... असं म्हणण्याची वेळ या रस्त्यामुळे आली आहे.

दरवर्षी जिल्ह्यातील अनेक भागात मार्चमध्ये विविध रस्त्यांचे पूलांची काम करण्यात येतात यामुळे एप्रिल आणि मी या दोन महिने या रस्त्यावरून जाताना हायसं वाटतं मात्र जूनमध्ये जसा पाऊस सुरू होतो या रस्त्यांची वाताहात सुरू होते. कारण काही रस्ते तर अगदी पहिल्याच पावसात खड्डे नाही होतात मोखाडा तालुक्यातील सुद्धा बरेचशे रस्त्यांच्या वरील डांबर निघून गेल्यामुळे बारीक चुरीने रस्ते भरलेले आहेत. यामुळे रस्त्यावर झालेला कोट्या दिन चा निधी पाण्यात तर जात नाही ना असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे.

सध्या पावसाळ्यात पालघर जिल्ह्यातील विविध रस्ते यामध्ये मोखाडा ते नाशिक विक्रमगड ते मनोर विक्रमगड ते तलवाडा तलवाडा ते कासा वाडा ते मनोर अशा प्रत्येक तालुक्यातून पालघर मुख्यालयाला जोडणार्‍या रस्त्यांची अक्षरशा वाताहात झाली आहे यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांची जिल्हा गाठताना अक्षरशः दमछाक होत आहे याशिवाय रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडावा अशी काही ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे.

विक्रमगड ते मनोर रस्त्यावर केव या गावाच्या पुढे तर अक्षरशा गाडी नेमकी न्यायची कुठून असा सवाल वाहन चालकांसमोर उभा राहत आहे. त्याचबरोबर पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी जाऊन रस्ता बंद होऊ नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठ्या प्रमाणावर पूलांची काम हाती घेण्यात आली होती. ती काम पूर्ण झाली मात्र रस्ता आणि पूल हे अटॅच करण्यासाठी जे काही काम करावं लागतं ते व्यवस्थित न झाल्यामुळे आज ज्या ज्या ठिकाणी ह पूल बांधण्यात आलेली आहेत त्या ठिकाणी एक प्रकारचा गतिरोधक तयार झालेला दिसून येतो. यामुळे गड्या आपला पहिलाच रस्ता बरा होता असं सांगण्याची वेळ वाहन चालकावर आलेली आहे.

मुळात दरवर्षी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात रस्ते पूल यावर शासन कोटी निधीचा खर्च करते. मात्र मार्चमध्ये केलेला खर्च आणि त्या खर्चाचा उपभोग दोन महिनेच वाहन चालकांना किंवा प्रवास करणार्‍या नागरिकांना घेता येतो कारण पावसाळा सुरू झाला की रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे पडतात यामुळे या कामाच्या दर्जा विषयी सुद्धा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. या रस्त्यामुळे जिल्हा मुख्यालयाला जाणारे नागरिक मात्र मेटाकोटीला आलेले आहेत यामुळे किमान कधीतरी भविष्यात एखाद्या वर्षी पावसात तग धरू शकणारे डांबरी रस्ते निर्माण होतील की नाही हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.

रस्त्यांची मुदत दोन महिन्यांची असते का?

शक्यतो पाऊस उघडल्यानंतर मंजूर काम करण्यासाठीची सुरुवात होते. ही कामे मार्चपर्यंत चालतात कारण की सदर कामाची शक्यतो बिले ही मार्च 31 मार्च रोजी दिली जातात नव्या नियमानुसार काम करणार्‍या ठेकेदाराला या कामाची देखभाल दुरुस्ती किमान एक दोन तीन वर्षांच्या असतात मात्र आज घडीला मार्चमध्ये झालेली काम जूनच्या पहिल्याच पावसात खराब कसे होतात रस्त्यांना डबक्याचे स्वरूप कसे येतं हा संशोधनाचा भाग आहे.

यामुळे मार्चमध्ये बिल देण्यात येणार्‍या कामांची मुदत ही फक्त दोन महिन्यांसाठीची असते का असा उपरोधिक सवाल या रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे विचारला जात आहे. आणि जर या कामाची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदाराची असेल तर खड्डा पडताक्षणी काही दिवसातच तो बुजवण्यात यायला हवा. मात्र असं होत आणि दिसत नाही यामुळे या कामांच्या दर्जांची चौकशी व्हायला हवी अशी मागणी येते म्हणून होत आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news