Palghar news : विक्रमगडमधील घाणेघर ग्रामस्थांची कसरत थांबणार कधी ?
विक्रमगड : विक्रमगड तालुक्यातील भोपोली हद्दीतील घाणेघर या गावात अनेक वर्षांपासून पूलाची मागणी प्रलंबीत आहे.याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून आतातरी या गंभीर समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गापासून हाकेच्या 8 किमी अंतरावर मनोर-विक्रमगड मार्गांवर असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत भोपोली-घाणेघर अंतर्गत येणार्या सुमारे घाणेघर गावाची 2350 आदिवासी लोक वस्ती आहे गावात जाण्यासाठी बोंराडा गावाजवळून सुमारे 6 ते 7 किलोमीटर अंतराचा फेरफटका मारून खडकाचा रस्ता आहे. या मार्गाचा वापर करुन गावक-यांना विद्यार्थ्यांना जावे लागते तसेच गावातील सरकारी कामा करीता या लाकडी साकावचा लोकांना पालघर व विक्रमगड तसेच कार्यालय गाठावे लागतात.
भोपोलीआश्रमशाळा येथे 1 ली ते 12 वी चे वर्ग आहेत तसेच श्रीम. के. जे. जोगानी हायस्कूल असून तेथे 5 वी ते 10 वी पर्यंत वर्ग आहेत. विशेषत: जवळपास 150 विद्यार्थ्यांना शाळेत व कॉलेजला जाण्यासाठी भोपोली गाव मधल्या मार्गाने जावे लागते.
सदर मार्ग अवघ्या दीड किलोमीटर अंतरावरचा आहे. पावसाळ्यात मात्र हा दिड किलोमीटरचा अंतराचा रस्ता अतिशय अवघड बनतो. येथील ओहोळ ओलांडताना गावक-यांची रुग्णांची तसेच विद्यार्थ्यांची दमछाक होते. पालक विद्यार्थ्यांच्या मदतीला येतात. व पाणी भरून वाहत असलेल्या ओहळाच्या अंतराचा रस्ता अतिशय तारेवरची कसरत करत पार करावा लागतो.
पालक विद्यार्थ्यांच्या मदतीला येतात तसेच शिक्षकही मदतीला येतात व भरून वाहत असलेल्या लाकडी साकाव वरून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवतात. यंदा मात्र गावातील दरवर्षी प्रमाणे या वर्षी लाकडाच्या सहाय्याने तात्पुरता पूल उभारला असून या लहानशा पुलावर जातात विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. ग्रामपंचायत कडून आजवर स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्याकडे वारंवार मंजूरी करीता आग्रह धरला आहे.
अंदाजपत्रक तयार करुन जिल्हा नियोजन समिति कडे सादर केले आहे. अद्याप प्रशासनचे दुर्लक्ष दिसून येत आहे हा प्रश्न आता स्थानिक लोकप्रतिनीधी व जिल्हा परिषद विभागाने गांभीर्य घेऊन सोडवावा अशी मागणी सरपंच महेंद्र पाटील यांनी सरपंच या नात्याने प्रशासन कडे केली आहे. लवकरात लवकर पाहणी करुन पुराची मागणी पूर्ण करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. दरवर्षी अशा घटना घडत असतात. त्यामुळे किमान आता तरी पुलाला मंजुरी द्यावी अशी मागणी महेंद्र पाटील सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भोपोली-घाणेघर यांनी केली आहे.

