Vasai Virar Water Supply Disruption: वसई-विरारमध्ये पाणी टंचाई होतेय तीव्र

पाणीपुरवठा वांरवार होतोय ठप्प, नागरिकांचा संताप अनावर
Water Crisis
Water Crisis file photo
Published on
Updated on

मनवेलपाडा: पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता वसई-विरार शहरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाल्याने हजारो कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घरांतील नळ कोरडे पडल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असून दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.

मुसळधार पावसामुळे जलवाहिन्या, पाणीपुरवठा यंत्रणा आणि संबंधित सुविधांवर परिणाम झाल्याने शहरातील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला आहे. प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.

अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना टँकर, विहिरी किंवा इतर पर्यायी स्रोतांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांच्या कुटुंबांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसत आहे.

Water Crisis
Shahapur Waterfall Tragedy: शहापूरच्या चोंढे धबधब्यावर मोठी दुर्घटना! पाच पर्यटक गेले वाहून; एकाचा मृत्यू, एक बेपत्ता

सकाळी घरगुती कामे, स्वयंपाक, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेक गृहसंकुलांमध्ये साठवून ठेवलेले पाणीही संपल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

नागरिकांनी प्रशासनाकडे संताप व्यक्त करत तातडीने पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. अनेक ठिकाणी टँकरची मागणी वाढली असून काही भागांमध्ये पाण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक तसेच लघुउद्योगांनाही या पाणीटंचाईचा फटका बसू लागला आहे.

Water Crisis
Gen Z Shivaji Park Political Rally: शिवाजी पार्कवर ‘इन्स्टा’ जनरेशनचा राजकीय कल्ला

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले असून, पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे सांगितले आहे. मात्र, नागरिकांचा प्रश्न आहे की, सलग दोन दिवस पाणी नसताना पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही? अशी भावना आता सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

स्थानिक लोकप्रतिनिधींनीही परिस्थितीची गंभीर दखल घेऊन संबंधित विभागाला उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. काही दिवसही पाऊस कायम राहण्याच्या शक्यतेने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news