

वसई : वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने मतपत्रिकेवरील निवडणूक चिन्ह अस्पष्ट असले बाबतच्या तक्रारी बहुजन विकास आघाडी आणि अन्य काही राजकीय पक्षांकडून करण्यात आल्या होत्या. या संदर्भातील आक्षेपावर वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
सर्व उमेदवारांची नावे जाहिर झाल्यानंतर मतदानाच्या अनुषंगाने उमेदवारांची नावे व चिन्हे नमूद असलेले मतपत्रिका शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथून मुद्रीत करुन आणण्यात आलेल्या आहेत. या शासकीय मुद्रणालयात इतर महापालिकांच्याही मतपत्रिका मुद्रीत करण्यात आलेल्या आहेत.तसेच चिन्ह वाटपांच्या वेळेत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नव्हती. अशी माहिती पालिकेने प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या .08 नोव्हेंबर 2025 च्या अधिसुचनेनूसार वसई विरार शहर महानगरपालिकेतील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या अनुषंगाने उमेदवारांना देण्यात येणारे निवडणूकीचे चिन्हांची जाहीर प्रसिध्दी करण्यात आली होती. त्यानुसार उमेदवारांनी त्यांच्या आवडीचे चिन्ह उमेदवारी नमून्यामध्ये सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिन्ह वाटपाबाबत कार्यवाही केली व उमेदवारांना त्यांचे मतपत्रिकेवर छापावयाचे नाव व चिन्ह यांची माहिती देणेंत आली. चिन्ह वाटपांच्या वेळेत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. तद्नंतर अंतिम उमेदवारांची नावे जाहिर झाल्यानंतर मतदानाच्या अनुषंगाने उमेदवारांची नावे व चिन्हे नमूद असलेले मतपत्रिका शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथून मुद्रीत करुन आणण्यात आलेल्या आहेत.
या शासकीय मुद्रणालयात इतर महापालिकांच्याही मतपत्रिका मुद्रीत करण्यात आलेल्या आहेत व त्यामुळे सदर तक्रारीत कुठलेही तथ्य नाही. तसेच याबाबत काही राजकीय पक्षांनी लेखी व मौखिक तक्रार केली होती. याबाबत मा.आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्र.1 यांच्या कार्यालयात भेट देऊन संबधित पक्षांच्या उमेदवारांशी चर्चा करुन त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतपत्रिकेतील निवडणूक चिन्हांबाबत वस्तूस्थिती समजावून सांगितली व त्यांनी ती मान्यही केली. तसेच काही पक्षांचे पदाधिकारी काही कामानिमित्त मा.आयुक्त यांचेकडे आले असता मा.राज्य निवडणूक आयोगाचे आदेश व चिन्ह त्यांना दाखविणेत आले व त्यानुसारच शासकीय मुद्रणालय, चर्नी रोड, मुंबई येथून छपाई केल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
याअर्थी वसई विरार शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने मतपत्रिकेवरील अंतिम उमेदवारांच्या नावाबाबत व चिन्हांबाबत महानगरपालिका निवडणूक विभाग व सर्व निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमार्फत मा.निवडणूक आयोगाच्या नियमानूसारच योग्य ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. त्यामुळे सदरच्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसल्याचे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाने म्हटले आहे.