

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेमार्फत अनधिकृत बांधकाम निष्कासनाच्या कारवाईने चांगलाच जोर धरला आहे. गुरुवारी सलग चौथ्या दिवशीही मनपा हद्दीतील एकूण 38750 चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
वसई-विरार महानगर पालिका हद्दीत अनधिकृत बांधकामावर कारवाईने वेग घेतला आहे. यासाठी विशेष पथक नेमणूक करण्यात आल्या असून प्रभाग निहाय अनधिकृत बांधकाम व अतिधोकादायक इमारती, वाणिज्य, चाळी, निष्कासनासाठी गेले चार दिवस सतत मोहीम राबविण्यात येत आहे. गुरवारी सप्टेंबर रोजी पालिका हद्दीतील 38750 चौ. फुट अनधिकृत बांधकाम व अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती ओ, हद्दितील भेडा चाळ साईबाबा मंदिराजवळ, गावठन रोड अति धोकादायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण 300 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. प्रभाग समिती बी, हद्दितील निळकंठ इमारत, बजरंग नगर, मोरेगाव तलावा जवळ अति धोोकदायक बांधकामावर निष्कासनाची कारवाई केली असून एकुण 2000 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. प्रभाग समिती - सी, हद्दितील साई इमारत, काोपरी येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण 2400 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे.
प्रभाग समिती - ई, हद्दितील न्यु पुजा इमारत, समेळपाडा येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण 1200 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. प्रभाग समिती - एफ, हद्दितील वाकणपाडा, येथे अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सुरु असून एकुण 1000 चौ. फुट बांधकाम निष्कासन करण्यात आलेली आहे. तसेच विशेष नियोजन प्राधिकरण अंतर्गत विरार फाटा, येथे 10000 चौ.फुटाचे आरसीसी पत्रा शेडचे व अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.सलग सुरू असलेलल्या अनधिकृत बांधकाम कारवाईमुळे समाधान व्यक्त केले जात आहे.