खानिवडे : मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर मुंबईतून आणलेला कचरा, राडारोडा वसई विरारच्या हद्दीत रस्त्यांच्या, महामार्गाच्या कडेला बिनदिक्कत पणे फेकून दिला जात आहे. हा राडारोडा वेशीवरच रोखण्यासाठी प्राधिकरणाकडून वर्सोवा पुलाजवळ चौकी तयार करण्यात आली आहे. मात्र त्या ठिकाणी अजूनही कर्मचारी नियुक्त न करण्यात आल्याने ही चौकी रिकामीच आहे. त्यामुळे सद्ध्या महामार्गाच्या आणि अंतर्गत रस्त्यांच्या कडा ह्या कचरा आणि राडारोडा यांचे फुकटचे डंपिंग ग्राउंड झाले आहे. यात प्रशासन मात्र शांतपणे झोपलेले दिसून ये असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, गुजरातसह इतर शहरांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. आधीच हा महामार्ग विविध समस्यांनी ग्रासला आहे. त्यातच मागील दोन ते तीन वर्षांपासून महामार्गावर राडारोडा आणून टाकण्याचे प्रकार सुरू झाले आहेत
विशेषत : मुंबई सह अन्य ठिकाणी इमारतींचा पुनर्विकास व अन्य विकास कामे झपाट्याने सुरू आहेत. त्यामुळे खोदकाम, जुनी बांधकामे तोडणे त्यामुळे मोठ्या प्रमाणात राडारोडा बाहेर निघत आहे. या राडारोड्याची विल्हेवाट लावण्याऐवजी थेट मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई विरार शहराच्या हद्दीत टाकला जात आहे.
रात्रीच्या सुमारास छुप्या मागनि मुंबई व अन्य भागातील राडारोड्याने भरलेली वाहने महामार्गालगत खाली केली जात आहेत. वर्सोवा पुलापासून ससूनवघर, मालजीपाडा, चिंचोटी, नायगाव, सातीवली फाटा, पेल्हार विरार अशा विविध ठिकाणी हा राडा रोडा टाकून दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस अधिकच जटिल बनू लागली आहे. हा राडारोडा शहरात दाखल होत असताना त्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने शहरात राडा रोडा टाकण्याचे प्रकार वाढले होते. यामुळे महामार्गावर पूरस्थिती व वाहतूक
कोंडीच्या समस्यांना सामोरे जावते. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत महामार्ग प्राधिकरण, महसूल विभाग, पोलीस प्रशासन व महापालिका अधिकारी यांची बैठक झाली होती.
यावेळी शहरात व महामार्गावर येणारा राडारोडा रोखण्यासाठी शहराच्या वेशीवर अर्थात वर्सोवा पूल या ठिकाणी तपासणी केंद्र (चेक पोस्ट) तयार करण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार वर्सोवा येथे महामार्ग प्राधिकरणाने राडारोडा तपासणीसाठी चौकी तयार केली आहे. मात्र मागील दोन महिन्यांपासून या चौकीत राडारोडा नियंत्रणासाठी कोणीच नसल्याने त्याठिकाणची चौकी रिकामीच असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात राडारोडा टाकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सद्यस्थितीत १२१ किलोमीटर पर्यंत कॉक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र राडारोडा मध्येच आणून टाकला जात असल्याने अडचणी येत आहेत. राडारोडा रोखण्यासाठी चौकी तयार केली मात्र त्यात कोणी कर्मचारी नाही, त्यावर कारवाई करण्यासाठी कर्मचारी नियुक्त करावा यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना पत्र दिले जाणार आहे. असे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.