Umargam Industrial Warehouse Fire : उमरगावच्या नगवासमधील गोदामांना भीषण आग

१६ किमीपर्यंत धुराचे साम्राज्य, अग्निसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Umargam Industrial Warehouse Fire
Umargam Industrial Warehouse Firepudhari photo
Published on: 
Updated on: 

तलासरी : गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील वलसाड जिल्ह्यातील उमरगाव तालुक्यातील नगवास येथे मंगळवारी दुपारी एक अत्यंत धक्कादायक आणि भीषण दुर्घटना घडली. येथील औद्योगिक गोदामांच्या संकुलाला लागलेल्या महाकाय आगीने संपूर्ण परिसराला हादरवून सोडले आहे. एका गोदामातून सुरू झालेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण करत शेजारील इतरही अनेक गोदामांना आपल्या कवेत घेतले. या आगीची भीषणता इतकी प्रचंड होती की, त्याचे काळेकुट्ट धुराचे लोट तब्बल १६ किलोमीटर दूर महाराष्ट्रातील तलासरी परिसरातूनही आकाशात स्पष्टपणे दिसत होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या गोदामांमध्ये पेन्सिल, औद्योगिक ऑइल, प्लास्टिक तसेच विविध नामांकित कंपन्यांचा कच्चा आणि तयार माल मोठ्या प्रमाणावर साठवून ठेवण्यात आला होता. ऑइल आणि ज्वलनशील पदार्थांमुळे आगीचा भडका उडाला आणि काही मिनिटांतच संपूर्ण परिसर धुराच्या काळ्या साम्राज्यात वेढला गेला. यामुळे स्थानिक कामगार आणि नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून परिसरात मोठी धावपळ उडाली.

Umargam Industrial Warehouse Fire
Palghar Crime : गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त; २,५०० लिटर रसायन नष्ट

घटनेची माहिती मिळताच वापी, उमरगाव आणि सरीगाम येथून अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाण्याचे प्रचंड फवारे मारून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, साठवून ठेवलेल्या साहित्यामुळे आग सातत्याने पसरत आहे.

या दुर्घटनेमुळे स्थानिक गोदामांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुरेशा सुरक्षा यंत्रणांचा अभाव स्थानिक नागरिकांचे जीवन आणि पर्यावरण दोन्हीसाठी अत्यंत घातक ठरत आहे. आगीचे नेमके कारण, जीवितहानी आणि नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, याचा अधिकृत तपशील अद्याप समजू शकलेला नाही. प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

Umargam Industrial Warehouse Fire
Raigad Crime : रायगडच्या दुर्गम भागातील मोबाईल टॉवर्स लुटणाऱ्या हायटेक टोळीचा पर्दाफाश

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news