

पालघर/बोईसर : पुढारी वृत्तसेवा
दारू पिण्यासाठी कमी पैसे दिल्याने वापाने मुलाला शिव्या दिल्याने रागाच्या भरात पोटच्या मुलाने बापाचा गळा आवळून खून केला. लक्ष्मण गोरखना असे मयत पित्याचे नाव असून नागझरी ब-हाणपूर रस्त्यावरील बोरशेती गावातील अस्वलीपाड्यात राहत होते.
सोमवारी दुपारी मयत लक्ष्मण मुकुंद गोरखना यांना त्याचा मुलगा सुरेश गोरखना याने दारू पिण्यासाठी फक्त दहा रुपये दिले म्हणून शिव्या दिल्याने आरोपी सुरेश याला राग आला होता, त्याने घरातील भाताचे भारे बांधण्याच्या दोरीने लक्ष्मण गोरखना यांना गळा आवळून ठार मारले.
याप्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लक्ष्मण मुकुंद गोरखना याच्या मृत्यू बाबत त्याची पत्नी पुनम आणि मुलगी सपना यांनी दिलेल्या माहिती नुसार सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागील शेतातील भात कापणीचे काम करून घरी पोहोचल्या नंतर लक्ष्मण गोरखना याने मुलगा सुरेश याच्याकडून दारु पिण्यासाठी पैसे मागितले असता सुरेशने त्यांना दहा रुपये दिले.
दारु पिऊन परतल्यावर दारू पिण्यासाठी दिलेले दहा रुपये कमी वाटल्याने सुरेशला शिव्या द्यायला सुरुवात केली होती. दिवाळीचा सण असताना वडिलांना दहा रुपये देतो तसेच आई वडिलांवर लक्ष देत नसल्याचे सांगत मोठयाने शिव्या द्यायला सुरुवात केली होती.
त्यामुळे राग आल्याने सुरेशने त्याचे वडील लक्ष्मण याला मारहाण केली. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास भाताचे भारे बांधण्याच्या दोरीने घराच्या पाठीमागे बसलेल्या लक्ष्मण गोरखना यांचा गळा दोरीने आवळल्याने बेशुध्द झाले होते.
बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्षण गोरखना यांचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. आरोपी सुरेश याने घरातील भाताचे भारे बांधण्याच्या दोरीने मयत त्याचे वडील लक्ष्मण गोरखना याला गळा आवळून ठार मारल्या प्रकरणी बोरशेती गावाचे पोलीस पाटलांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी सुरेश गोरखना याच्या विर- ोधात मनोर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोप सुरेश याला मनोर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.