

पालघर : मनोर- पालघर रस्ता राष्ट्रीय (१६० - अ) महामार्ग घोषित होऊन पाच वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु वाहनचालक आणि जिल्ह्यातील नागरिक महामार्गाच्या दर्जा नुसार पुरवल्या जाणाऱ्या सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. पालघर ते मनोर आणि जव्हार फाटा ते पाचमाड पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. शेकडो ओव्हरलोड अवजड वाहने धावत असल्यामुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. वाहनचालकांची गैरसोय होत असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी केली जात आहे. परंतु देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रकिया लांबल्याने वाहनचालकांची गैरसोय कायम राहणार आहे.
पालघरला जिल्हा मुख्यालय झाल्यापासून मनोर पालघर रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मुंबई बडोदा दृतगती महामार्गा सारख्या राष्ट्रीय प्रकल्पांच्या कामांसाठी माती, मुरूम आणि खडी इत्यादी गौण खनिजाची वाहतूक करणारी शेकडो वाहने दिवस रात्र मनोर पालघर रस्त्यावर धावत आहेत. विक्रमगड तालुक्यातील भोपली, केव फाटा, बांगरचोळा भागात क्रशर मशीन मधून खडी वाहतूक करणाऱ्या ट्रकची संख्या मोठी आहे. त्यामुळे जव्हार फाटा ते पाचमाड पर्यंतच्या रस्त्याची चाळण झाली आहे.
पालघर मनोर पासून विक्रमगड पर्यंतच्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीच्या काम करणाऱ्या ठेकेदाराची मुदत ऑक्टोबर महिन्यात पूर्ण झाली होती. त्यानंतर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी कंत्राटदार नसल्याने देखभाल दुरुस्तीचे काम ठप्प झाले आहे. दोन पदरी रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे असल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार आणि वाहनचालकांची गैरसोय होत आहे. महामार्गावरील खड्डे बुजवून तात्काळ दुरुस्तीची कामे सुरु करण्याची मागणी केली जात आहे.
मनोर आणि पालघर दरम्यानच्या वीस किलोमीटर अंतरावरील नेटाळी गावदेवी मंदिरा लगत, सन सिटी, हात नदीच्या पुलालगतचे वळण आणि सावरखंड उपकेंद्रालगत खड्डे पडले आहेत. जव्हार फाटा ते पाचमाड पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. क्रशर उद्योगांमधून खडी आणि भराव कामासाठी माती मुरूम वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहनांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे.
पालघर ते मोखाड्या पर्यंतच्या रस्त्याची देखभाल दुरुस्तीच्या कामाचे सुमारे चौदा कोटी रुपये रकमेची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मंत्रालय स्तरावरून परवानगी मिळताच ठेकेदार मिलन कंन्स्ट्रक्शन यांना कार्यादेश दिले मनोर आणि पालघर दरम्यानच्या वीस किलोमीटर अंतरावरील नेटाळी गावदेवी मंदिरा लगत, सन सिटी, हात नदीच्या पुलालगतचे वळण आणि सावरखंड उपकेंद्रालगत खड्डे पडले आहेत. जव्हार फाटा ते पाचमाड पर्यंतच्या रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. क्रशर उद्योगांमधून खडी आणि भराव कामासाठी माती मुरूम वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहनांची संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे रस्ता खड्ड्यात गेला आहे. जातील. खड्डे बुजवण्याचा कामाला प्राधान्य दिले जाईल.
- सतीश मोडक, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग.