Palghar News | भारोळमध्ये पादचारी पुलाखाली संशयास्पद पूजेचे साहित्य; पानावरील नावामुळे खळबळ

भानमतीचा प्रकार असल्याचा संशय, नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू
Vasai Bharol Village Bhanamati
पादचारी पुलाखाली संशयास्पद पूजेचे साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळPudhari
Published on
Updated on

Vasai Bharol Village Bhanamati

खानिवडे : वसई तालुक्यातील भारोळ गावच्या हद्दीतील मुंबई–दिल्ली महामार्गावरील पादचारी पुलाखाली संशयास्पद पूजेचे साहित्य आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पूजेच्या ठिकाणी सापडलेल्या वाळलेल्या पानावर लिहिलेल्या एका नावामुळे हा प्रकार नेमका काय आहे, याबाबत नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्क सुरू झाले असून भीतीचे वातावरण पसरले आहे.हा भानमतीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून अजूनही समाजात अंधश्रद्धा असल्याची चर्चा होत आहे.

मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्जन ठिकाणी सकाळी बाहेर पडलेल्या ग्रामस्थांना पूजेचे साहित्य दिसून आले. कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी पुलाखालचा हा प्रकार पाहिल्यानंतर परिसरात चर्चा सुरू झाली. पूजेच्या साहित्यामध्ये एका पानावर “कुणाल किशोर वाघेला” असे नाव स्पष्टपणे लिहिलेले आढळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Vasai Bharol Village Bhanamati
Palghar Weather: जिल्ह्यात ३ सप्टेंबरपर्यंत हलक्या स्वरूपात पाऊस; सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता

हे नाव कोणाचे आहे, ते तेथे कशासाठी लिहिले गेले आणि या साहित्यामागील उद्देश काय, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता संबंधित यंत्रणांनी या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

सकवार–भारोळ परिसर हा पूर्वी दुर्गम व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जात होता. मात्र महामार्गामुळे या भागाचा महानगरांशी संपर्क वाढला असून शिक्षण व माहिती तंत्रज्ञानामुळे अंधश्रद्धेपासून दूर जाणारी नवी पिढी अशा प्रकारांबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आहे. ग्रामस्थांनी या घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करून सत्य समोर आणण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news