

खानिवडे ःवसईची सुप्रसिद्ध मधुर केळी , रसाळ नागवेलीची पाने , स्वर्गीय सुगंधाचा सोनचाफा , महिलांच्या आवडत्या गजर्याचा मोगरा या पाठोपाठ परदेशी फळ अॅव्होकाडोची वसईत यशस्वी लागवड करून चांगले उत्पन्न प्रयोगशील शेतकरी घेत असल्याने आता वसईची अॅव्होकाडो असेही म्हणावे लागणार आहे.
वसईचे शेतकरी यांनी या अॅव्होकाडो पिकाची यशस्वी लागवड केली असून मागील वर्षी त्यांनी जवळपआ अडीच टन फळे उत्पादित केली होती. यंदा वातावरणाचा काहीसा फटका अॅव्होकाडो पिकाला बसल्याने मागच्या वर्षी पेक्षा कमी उत्पादन झाल्याचे राजोडी तील शेतकरी फ्रान्सिस तुस्कानो यांनी सांगितले.
हरित वसई म्हणून असलेली आपल्या वसईची ती ओळख कायम रहावी म्हणून अनेक वसईकर शेतकरी विकास कामांनी आणि काँक्रीटच्या जंगलांनी फुगणार्या वसईत आजही शेती कसून आपले योगदान देत आहेत .यामध्ये अनेक शेतकरी पारंपरिक शेती कसत आहेत .पण वसईत अनेक शेतकरी आता वेगवेगळे शेती प्रयोग करत आहेत.
मागील पाच वर्षांच्या काळात वसईच्या भालीवली या पूर्व ग्रामीण भागात यशस्वी स्ट्रॉबेरी लागवड केली गेली .तर अशक्यप्राय वाटणार्या हिमालयातील सफरचंदाची लागवड ही वसईच्या किरवलीत करण्यात आली आहे .यात आता भर पडली आहे ती विशिष्ट जीवनसत्वांनी युक्त असलेल्या अॅव्होकाडो या परदेशी फळाची यशस्वी लागवड .ही लागवड राजोडी च्या तुस्कानो कुटुंबांनी राजोडीत 25 व वटार येथे 25 अश्या 50 गुंठ्यांत केली आहे .
जेव्हा कोरोनाचा कहर सुरू होता तेव्हा लॉक डाउन च्या काळाचा सदुपयोग व्हावा म्हणून त्यांनी ही लागवड केवळ हौस म्हणून आणि कोरोनात मिळालेल्या नेहमीच्या कामाव्यतिरिक्त वेळेचा उपयोग व्हावा म्हणून लागवड केली होती .यात फळे नाही लागली तरी वाडीत सावली तर मिळेल हा उद्धेश होता .पण आपली धरती माता ही जगातील सर्वात जास्त परतावा देणारी असल्याने आज ते हे परदेशी फळ यशस्वीपणे पिकवत आहेत .या फळाला मागणीही भरपूर असल्याने त्यांच्या वाडीतच ग्राहक येऊन घेऊन जातात .
आवाकाडो हे एक पोषणमूल्यांनी भरलेलं फळ आहे. याला मराठीत माखनफळ किंवा बटरफळ असेही म्हणतात. हे फळ मूळचे मध्य अमेरिका व मेक्सिको येथील असून आता भारतातही काही ठिकाणी याची लागवड होते (उदा. कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्राच्या काही भागात).
हृदयासाठी उपयुक्त
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स मुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो.ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत करतो.तसेच पचनास ही मदत करतो.