Stray cattle safety : मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियम पट्टे

अपघात प्रतिबंधासाठी लायन्स क्लब ऑफ सफाळेचा उपक्रम
Stray cattle safety
मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियम पट्टेpudhari photo
Published on
Updated on

सफाळे : अलीकडे रस्त्यावर फिरणार्‍या मोकाट जनावरांमुळे विशेषतः रात्रीच्या वेळी होणार्‍या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी लायन्स क्लब ऑफ सफाळे तर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. 15) सफाळे परिसरातील मोकाट जनावरांच्या गळ्यात रेडियमचे पट्टे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमात लायन्स क्लब ऑफ सफाळेचे अध्यक्ष मनोज म्हात्रे, झोन चेअरपर्सन प्रमोद पाटील, केळवे सागरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया गोस्वामी, माकुणसार ग्रामपंचायतच्या सरपंच पल्लवी पाटील, उपसरपंच संकेत पाटील, क्लब सेक्रेटरी जतिन कदम, उपाध्यक्ष सचिन वर्तक, खजिनदार कुंदन राऊत, प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर पंकज म्हात्रे व भूपेश म्हात्रे, माजी अध्यक्ष नितीन वर्तक तसेच क्लबचे इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी सफाळे येथील स्टेट बँकेजवळ, कुर्लाई मंदिरासमोर आणि माकुणसार येथे मोकाट फिरणार्‍या जनावरांच्या गळ्यात सर्पमित्र पिंट्या मानकर यांच्याकडून रेडियम पट्टे बांधण्यात आले. या उपक्रमामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना जनावरे लांबून दिसून अपघात टाळण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news