

पालघर ः पालघर जिल्ह्यातुन सौदी अरेबिया देशात पायी प्रवास करून हज यात्रा पूर्ण करणार्या सना अंसारी हिने पुन्हा पॅलेस्टाइ देशातील मुस्लिमांचे श्रद्धास्थान असलेल्या मस्जिद -ए-अक्सा कडे जाण्याचा प्रवास सुरु केला आहे.
सोमवार पासून सनाचा प्रवास सुरु झाला आहे.सुमारे सहा हजार किलोमीटर लांबीच्या प्रवासात तीला तिचा पती अजीम शेख यांची साथ लाभणार आहे. मस्जिद ए अकसाच्या पायी प्रवासासाठी निरोप देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.निरोप देणार्यांनी सना अन्सारी ला फुलांच्या माळा घातल्या तसेच जेसीबीच्या साहाय्याने तिच्यावर फुलांची उधळण केली.
पालघर शहराच्या पूर्वे कडील डुंगी पाडा वीरेंद्र नगर भागातील रहिवाशी सना अन्सारी ने गेल्या वर्षी पालघर ते मक्का मदिना असा पायी प्रवास करून हज यात्रा पूर्ण केली होती.यात्रा पूर्ण करून दोन महिन्यांपूर्वी ती पालघर मध्ये दाखल झाली होती. आता पुन्हा तीने सहा हजार किलोमीटर अंतराच्या खडतर पायी प्रवासाचा निश्चय केला आहे. पालघर वरून पॅलेस्टाइन देशातील मस्जिद-ए-अक्सा येथे पोहोचण्यासाठी सना ला अनेक देशांची सीमारेषा पार करावी लागणार आहे.सुमारे सहा हजार किलोमीटर अंतर पार करण्यासाठी अंदाजे अकरा महिन्यांचा कालावधीत लागणार आहे.
युद्धग्रस्त अवस्थेत असलेल्या पॅलेस्टाइन देशातील प्रवासा बाबत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे.सोमवारी दुपारी तीने पालघरच्या वीरेंद्र नगर मधून पायी प्रवासाला सुरुवात केली,तीला आणि तिच्या पतीला निरोप देण्यासाठी नातलग आणि चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. याआधीच्या मक्का मदिना प्रवासा दरम्यान तीने पाकिस्तानसह पाच देशांची सीमा ओलांडत तब्बल 14 महिने पायी प्रवास केला होता.