सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ग्रामस्तरावरील यंत्रणेत कार्यरत असलेली मेलबिगारी कामगारांची पदे रद्द करण्यात आल्यापासून ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. याचे थेट परिणाम नागरिकांच्या सुरक्षिततेवर, पर्यावरणाच्या समतोलावर व वाहतूक व्यवस्थेवर दिसून येत आहेत. मेलबिगारीमुळे किरकोळ अपघात होवून, अनेकांचे जीव वाचले आहेत.
यापूर्वी मेलबिगारी कामगार हे रस्त्यावर पडलेले छोटे, मोठे, खड्डे तात्काळ माती टाकून बुजवत असत, त्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांची जाणीवसुद्धा होत नसे, मात्र आज मितीस रस्त्यावर पडलेले खड्डे, महिने-महिने उलटूनही तसेच पडलेले आहेत, व परिणामी अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. यापलीकडे मेलबिगारी फक्त खड्डे बुजवणेच नव्हे तर रस्त्याच्या कडेला असलेली झाडे पाणी देऊन जगवणे, कोवळ्या रोपांची निगा राखणे हे कामही मेलबिगारी करत असत. त्यामुळे आजही आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी उंच झाडे ही त्यांच्याच मेहनतीचे फलित आहे. मेलबिगारीच्या अनुपस्थितीत या झाडांचे रक्षणही होताना दिसत नाही. म्हणून शासनाने रस्त्यांची दुरावस्था बघून मेलबिगारी कामगारांची नियुक्ती करावी अशी मागणी होत आहे.
मेलबिगारी हे कामगार दिशादर्शक फलक, किलोमीटर दगड, वाहतुकीचे नियम दर्शवणारे बोर्ड, गार्ड स्टोन व सीमाचिन्हे यांच्या देखभालीचे कामही मेलबिगारी करत असत, हे फलक अर्धवट, यामुळे अनेक अडचणी होतात, तसेच रस्त्याकरिता काही मोठी अडचण असल्यास, काही प्रमाणात होणारे अपघात टळतील झाडाझुडपांत लपलेले किंवा पडलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांना दिशाभूल होते व अपघात वाढतात, म्हणून मेलबिगारी हे केवळ कामगार नव्हते, तर ते रस्त्यांचे खरे राखणदार होते. त्यांची कामगिरी ही जमिनीवरील यंत्रणा म्हणून ओळखली जात होती. म्हणून मेलबिगारी कामगारांची रद्द केलेली पदांचा विचार करून भरती करावी अशी मागणी आहे.
प्रशासनाने या पदांची आवश्यकता पुन्हा ओळखून मेलबिगारी पदांचे पुनरुस्थापन करणे गरजेचे झाले आहे. ही पुनर्बहाली फक्त रोजगारपुरती मर्यादित न राहता, ती रस्ते सुरक्षा, पर्यावरण रक्षण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी अपरिहार्य ठरणार आहे. शासनाने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा रस्त्यांवरील अपघातांची, गैरसोयींची व पर्यावरण हानीची किंमत संपूर्ण समाजाला चुकवावी लागेल, म्हणून मेलबिगारी कामगारांची पदांचा विचार करून पूर्ववत करावी अशी मागणी होत आहे.
पूर्वी मेलबिगारी कामगार असताना, एका पावड्याने संपर्ण रस्ता वाचत होता, यामुळे मेल कामगार भरणे खूप गरजेचे आहे, यामुळे अनेक छोट्या, मोठ्या रस्त्यांच्या अडचणी ते मेलबिगरी त्यांचं दिवशी बांधकाम विभागाला माहिती देतात, त्यामुळे अनेक घटना, अपघात, टाळणे यासाठी मद्दत होते, यामुळे मेलबिगारी कामगारांची नेमणूक करणे गरजेचे आहे.
नीलेश सुतार, वाहन चालक