

विक्रमगड : गेल्या काही वर्षांपासून लग्नाआधी प्री-वेडिंग, फोटोशूटकडे जोडप्यांसह त्यांच्या कुटुंबीयांचाही कल वाढलेला आहे. लग्नाआधीच्या आपल्या सुवर्णक्षणांना कायम लक्षात ठेवण्यासाठी तसेच आपल्या आठवणीना चिरतरुण ठेवण्यासाठी अनेकजण प्री-वेडिंग फोटोशूटचे माध्यम निवडत असतात. लग्ग्राआधीचे प्री-वेडिंग फोटोशूट हे खास आठवणी जपण्याचा उत्तम मार्ग आहे आणि ती आज एक फॅशनही बनली आहे. त्यासाठी एक ते दीड लाखाचा खर्च देखील केला जात आहे.
पूर्वी वधू-वराच्या हातावरील मेहंदी रंगली तर त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे, असे म्हटले जायचे. पण, आता लग्न एक इव्हेंट झाला आहे. इतकेच नव्हे तर या काळात प्री-वेडिंग फोटो शूटपासून ते लग्नापर्यंत अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यावर लाखोंचा खर्च होतो. यात सर्वाधिक भर प्री वेडिंगवर दिला जातो. ती आजकाल एक फॅशनही बनली आहे. त्यामुळे नव वधू-वर लग्रापूर्वी प्री- वेडिंग फोटोशूट करून लग्र सोहळ्यात एका मोठ्या स्क्रीनवर नातेवाईक, मित्रमंडळींना दाखविण्याची प्रथाच रुढ होत चालली आहे.
लग्नाआधी प्री- वेडिंग, फोटोशूटकडे जोडप्यांसह त्यांच्या कुटुंबीर्याचाही कल वाढलेला आहे. लग्नाआधीच्या सुवर्णक्षणांना कायम लक्षात ठेवण्यासाठी ही एक फॅशन बनत आहे. प्री-वेडिंग शूटसाठी स्टायलिश सलवार सूट हा उत्तम मार्ग आहे. यामुळे आपले व्यक्तीमत्त्व अधिक उठून दिसते. प्री-वेडिंग शूट दरम्यानचे तुमचे फोटोही अधिक चांगल्या प्रकारे शूट होऊ शकतील. लग्नापूर्वी समुद्र किनारी तसेच प्री-वेडींगसाठी उभारलेल्या स्टुडिओमध्ये जाऊन फोटोग्राफी, अल्बम, ड्रोन शूटिंग केले जाते. त्यासाठी किमान एक ते दीड लाख रुपये खर्च येतो