Palghar ZP School News | इंग्रजी शाळांच्या आकर्षणामुळे पटसंख्या रोडावतेय

Zilla Parishad School Efforts | जि. प. शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश वाढवण्यासाठी प्रयत्न
Public vs Private Schools
ZP School(File Photo)
Published on
Updated on

Public vs Private Schools

पालघर : इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील पालकांचा त्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे कल वाढत असल्यामुळे जिल्हा परिषद तसेच शासकीय अनुदान प्राप्त शाळांमध्ये प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दरवर्षी घटत चालली आहे.विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा बंद झाल्या आहेत. एकेकाळी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना अवकाळा प्राप्त झाली आहे.त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढवण्याचा निश्चय शिक्षण विभागाने केला आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी वाढवण्याच्या शिक्षण विभागाचा उद्देश आहे.परंतु पालकांमध्ये असलेल्या इंग्रजी शाळांच्या आकर्षणामुळे शिक्षण विभागाला कठोर परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागा अंतर्गत एकूण तीन हजार 308 शाळा आहेत.जिल्हा परिषद शाळांमधील सात लाख 49 हजार 774 विदयार्थ्यांपैकी मुलांची संख्या तीन लाख लाख 88 हजार 201 आहे तर मुलींची संख्या तीन लाख 61 हजार 573 इतकी आहे.

Public vs Private Schools
Palghar News : विक्रमगडमध्ये विजेची समस्या जटिल

जिल्हा परिषदेतील तालुका निहाय पटसंख्या

तालुका पटसंख्या

डहाणू 90059

जव्हार 28578

मोखाडा 18744

पालघर 115984

तलासरी 45011

वसई 375345

विक्रमगड 32746

वाडा 43307

Public vs Private Schools
ZP School | झेडपीच्या पोरांच्याही हातात आला टॅब!

पटसंख्या वाढीचे उद्दिष्ट

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याचे जिल्हा परिषदेच्या वतीने निर्देश देण्यात आलेले आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वर्गात विद्यार्थी वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.शाळांमधील मुख्याध्यापकांकडे विद्यार्थी संख्या वाढवण्याच्या मोहिमेची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रवेश घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांच्या भेटी घेऊन त्यांचे समुपदेशन करून त्यांना जि. प मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. बीटभट्टीवर कामावर जाणार्‍या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अभियान चालवले जाणार आहे.

यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्ता आणि पटसंख्या वाढीसाठी नियोजन केले जात आहे.शिक्षण विभागाचे नियोजन बद्ध रीतीने प्रयत्न सुरु आहेत.आगामी काळात बदल दिसून येतील.

सोनाली मतेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक,जिल्हा परिषद पालघर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news