Palghar News : मृत शिक्षकाच्या पत्नीला 1 कोटी 15 लाखांचा अपघाती विमा दावा सुपूर्द

ऑक्टोबर 2023 मध्ये जिल्हा परिषद, पालघर आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यात सामंजस्य करार
Accident insurance claim
मृत शिक्षकाच्या पत्नीला 1 कोटी 15 लाखांचा अपघाती विमा दावा सुपूर्दPudhari File Photo
Published on
Updated on

पालघर : सामाजिक जबाबदारीला प्राधान्य देणार्‍या युनियन बँक ऑफ इंडियाने 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पालघर येथे आपल्या संवेदनशीलतेचे आणि पारदर्शकतेचे उत्तम उदाहरण सादर केले. ऑक्टोबर 2023 मध्ये जिल्हा परिषद, पालघर आणि युनियन बँक ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचार्‍यांना वेतन खात्यासोबत जीवन विमा, अपघाती विमा आणि आरोग्य विमा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या योजनेचा लाभ दिवंगत शिक्षक स्व. विलास दत्तू मढवी यांच्या कुटुंबाला मिळाला. बँकेने त्यांच्या पत्नी रंजना विलास मढवी यांना रु. 1 कोटी 15 लाखांचा अपघाती मृत्यू विमा दाव्याचा धनादेश आज जिल्हा परिषद पालघर येथील जननायक बिरसा मुंडा सभागृहात आयोजित कार्यक्रमात सुपूर्द केला.

धनादेश सुपूर्द करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे म्हणाले, जिल्हा परिषदेतील प्रत्येक कर्मचार्‍याने युनियन बँकेसोबत झालेल्या या सामंजस्य करारांतर्गत उपलब्ध असलेल्या जीवन, अपघाती आणि आरोग्य विमा पॅकेजचा लाभ घ्यावा. ही सुविधा केवळ आर्थिक संरक्षणच नाही, तर संकटाच्या काळात कुटुंबासाठी एक मजबूत आधार ठरते.

या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा डॉ. रूपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सचिन कवठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इजाज अहमद शरीक मसलत, अतुल पारसकर, आर.एच. पाटील, जिल्हा परिषदेचे माजी मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे, युनियन बँक ऑफ इंडियाचे उपक्षेत्र प्रमुख सावन शिव, रवि रंजन, तसेच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news