SFI Student Protest Palghar : शिक्षकांच्या कमतरतेविरोधात एसएफआयचे बेमुदत आंदोलन

जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेशाचा प्रयत्न
SFI Student Protest Palghar
SFI Student Protest Palgharpudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर : जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता, अपुऱ्या मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच आहे. मागण्या मान्य होत नसल्याने संतप्त झालेल्या आंदोलकांनी गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावरच आंदोलकांना रोखल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याने त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचा आरोप एसएफआयने केला आहे. विशेषतः नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयानुसार शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. शिक्षकांच्या अपुऱ्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फटका बसत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

SFI Student Protest Palghar
Thane Road Safety : घोडबंदर रोड कासारवडवली उड्डाणपूल धोकादायक

जिल्ह्यातील बंद असलेले वर्ग तातडीने सुरू करावेत, तसेच शाळांमध्ये आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश आणि पाठ्यपुस्तके मिळावीत, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय शिक्षकांना अध्यापनाच्या मूळ कामाव्यतिरिक्त इतर शासकीय कामे देऊ नयेत, अशी मागणी एसएफआयने केली आहे.

शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवले जात असल्याने त्याचा परिणाम अध्यापनावर होत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांशी संबंधित मागण्या असून प्रशासनाने त्या गांभीर्याने घ्याव्यात, अशी भूमिका एसएफआयने घेतली आहे. मागण्या मान्य करून ठोस निर्णय होईपर्यंत बेमुदत आंदोलन मागे घेणार नसल्याचा निर्धार एसएफआयचे जिल्हाध्यक्ष जयेंद्र दुमाडा यांनी व्यक्त केला.

SFI Student Protest Palghar
Rangumata Devi Temple : तळोशी येथील नवसाला पावणारी देवी 'श्री रंगुमाता'

मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली. गुरुवारी जिल्हा परिषद कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावरच आंदोलकांना अडवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news