Palghar Scrap Godown Fire: पालघरमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग; दोन छोटे टेम्पो जळून खाक

डुंगीपाडा परिसरात मध्यरात्रीची घटना; अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळवले नियंत्रण
Palghar Scrap Godown Fire
Palghar Scrap Godown FirePudhari
Published on: 
Updated on: 

पालघर शहर: एका भंगार गोडाऊन आणि दोन लहान टेम्पोंना आग लागल्याची घटना पालघर शहराच्या पूर्व परिसरात घडली आहे. अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळी दाखल होत, आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पालघर- मनोर मार्गावरील रेल्वे ओवर ब्रिजखाली असलेल्या डुंगीपाडा परिसरातील एका भंगार गोडाऊनला अचानक आग लागली.

Palghar Scrap Godown Fire
Borivali Virar Railway Project: बोरीवली-विरार पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकांना गती; दहिसर-मिरा रोडदरम्यान जमीन मजबूत करण्याचे काम सुरू

शुक्रवारी मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. दरम्यान भंगार गोडाऊनला आग लागल्याने भंगाराच्या गोडाऊनमध्ये असलेल्या सामानाने पेट घेतला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. आगीचे आणि धुराचे लोट सर्वत्र पसरू लागले आणि भंगार दुकानासमोर उभ्या असलेल्या दोन लहान टेम्पोंपर्यंत ही आग पसरल्याने हे दोन लहान टेम्पोदेखील आगीच्या भक्षस्थानी आले.

आग लागल्याची बाब स्थानिकांच्या निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी भंगार दुकानाला आणि दोन लहान टेम्पोंना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे कारण अस्पष्ट असून सुदैवाने आगीच्या या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भंगार दुकान आणि दोन लहान टेम्पो आगीत जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

Palghar Scrap Godown Fire
Borivali Virar Railway Project: बोरीवली-विरार पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकांना गती; दहिसर-मिरा रोडदरम्यान जमीन मजबूत करण्याचे काम सुरू

पालघर नगरपरिषद अग्निशमन दलाचे लिडींग फायरमन रुचित दवणे, यंत्र चालक निलेश पाटील, फायरमन संकेत पाटील, चेतन जाधव, कैलास तामोरे, राहुल किंजरा यांनी यांनी आग विझवून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याची यशस्वी कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.