

Palghar schools closed
पालघर: मुंबई व उपनगरात मुसळधार पावसाने जोर धरल्याने भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्यासाठी उद्या (19 ऑगस्ट) रेड अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असले तरी संभाव्य अतिवृष्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. मात्र, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामकाज सांभाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सध्या पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण कमी असले तरी मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाने थैमान मांडले आहे अशा स्थितीत उद्या 19 रोजी पालघर जिल्ह्यात सुद्धा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यामुळे उद्या जिल्ह्यातील सर्व शाळा अंगणवाड्या महाविद्यालय यांना सुट्टी असणार आहे. हा निर्णय नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला असून पालघर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था उद्या बंद राहणार आहेत.