

पालघर : सध्या महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून जोरदार धडक कारवाया सुरू झाल्यानंतर भेसळ करणारे तसेच गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेटचा देखील पर्दाफाष होत असतानाच पालघर पोलिसांनी देखील वाखण्याजोगी कारवाई केल्याचे समोर आले आहे. पालघर जिल्हा पोलीस विभागाकडून पाच महिन्यात तब्बल 97 लाख 28 हजार 32 रुपयांचा गुटखा जप्त केल्याचे समोर आले असून यामध्ये 47 लाख 40 हजार किमतीची वाहने देखील पकडण्यात यश आले आहे. 2026 मधील अवघ्या पाच महिन्यात गुटखा विरोधात तब्बल 15 कारवाया केलेले आहेत यामध्ये तेरा कार्यामधील आरोपी अटक देखील करण्यात आले आहेत. यामुळे गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेटचे कंबरड मोडले असल्याचे दिसून येत आहे.
तर पालघर पोलिसांकडून अमली पदार्थ विरोधात देखील कारवाईचे धडक सत्र सुरू असून अवघ्या पाच महिन्यात डहाणू सफाळा पालघर कासा तलासरी मनोर वानगाव या भागात आपर्यंत 16 कारवाया करण्यात आलेले आहेत.यामध्ये गांजा ब्राऊन शुगर, एमडी, डोडा पावडर अशा अमली पदार्थांवर धाड टाकून ते जप्त करण्यात आले आहेत यामध्ये तब्बल 76 लाख 82 हजार 890 रुपयांचा हा माल असून या कामी 7 लाख किमतीची वाहने देखील जमा करण्यात आली आहेत तर आरोपीकडील फोन वजन काटा रोख रक्कम या कामी जवळपास 1 लाख 45 हजार 234 रुपयांचा मुद्देमाल देखील या कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे.
तर गुटखा आणि अमली पदार्थांबरोबरच लाखो संसारांची राख रांगोळी करणाऱ्या जुगारांच्या अड्ड्यावर देखील या पाच महिन्यात धाडसत्र सुरू असल्याची माहिती पालघर पोलिसांकडून देण्यात आलेली आहे यामध्ये आतापर्यंत दोन लाख 96 हजार 575 रुपये जप्त करण्यात आले असून यामध्ये 65 जुगारांवर कारवाई देखील झालेली आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात सध्या गुटखा माफिया बरोबरच जुगार अड्डे चालवणारे आणि आमले पदार्थांची विक्री करणाऱ्या रॅकेटचा स्पर्धा फास्ट करण्यासाठी पालघर पोलिसांनी कंबर कसल्याचे या कारवाया मधून दिसून येत आहे. तरी देखील अनेक ठिकाणी सोप पद्धतीने असे प्रकार घडत असल्यास त्याबाबत गुप्त पद्धतीने पालघर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन देखील पालघर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
या कारवायांबद्दल माहिती घेतल्यास डहाणू तालुक्यातील वानगाव तसेच मुंबई अहमदाबाद मार्गावर असलेले कासा आणि याच महामार्गावर असलेले मनोर या भागात अधिक कारवाया झाल्याचे दिसून येत आहे.यामुळे या अवैध धंदे करणाऱ्या आरोपींकडून रेल्वे स्टेशन नजीक असलेली गावे आणि मुंबई अहमदाबाद मार्गावर येणाऱ्या ठिकाणांना लक्ष करून तिथून आपल्या कारवाया जिल्हाभर पसरविले जात आहेत काय ? याचा देखील शोध घेणे आवश्यक बनले आहे.