बोईसर : भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा आनंद बोईसर मध्ये शोभायात्रा काढून साजरा केला. बोईसर तारापूर मधील मराठी भाषा प्रेमींकडून बोईसर मध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. कोकण मराठी साहित्य परिषद तारापूर शाखा, मर्मबंध साहित्य व कला संस्था आणि रोटरी क्लब तारापूर बोईसर शाखेच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचे आयोजन करण्यात होते.
बोईसर रेल्वे स्थानका वरून शोभा यात्रेस प्रारंभ झाला. मराठी भाषेचा जयजयकार करत आणि स्तुतीगीते गात मोठ्या उत्साहात शोभायात्रा पार पडली. शोभायात्रे नंतर आयोजित सभेत मान्यवरांनी मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठीच्या उपक्रमांसंदर्भात मार्गदर्शन केले. कोकण मराठी साहित्य परिषद व मर्मबंध साहित्य व कला मंच चे जिल्हा कार्यवाहक सुहासजी राऊत यांनी सभेचे प्रास्ताविक केले.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रविण दवणे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून शासन दरबारी केलेला संघर्ष विषद केला. मर्मबंध साहित्य व कला संस्थेच्या अध्यक्षा नम्रता माळी पाटील यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्या नंतर मराठी साहित्यिकांवरील वाढलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली आणि त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची थोडक्यात ओळख करून दिली. बोईसर ब्राह्मण संघाचे उपाध्यक्ष व तारापूर औद्योगिक कविता सादर करण्यात आल्या. कोकण मराठी साहित्य परिषद तारापूर चे प्रसिद्ध साहित्यिक व समन्वयक संजय घरत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राणे यांनी मराठी भाषेतील आधुनिकीकरण स्वीकारतानाच भाषेचा दर्जा राखण्यासाठी प्रमाण मराठीला विसरून चालणार नाही व त्यासाठीच मराठी बोलण्याचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचावयास हवा असे मत व्यक्त केले. मराठी भाषेच्या आध्यापिका, लेखिका, कवयित्री आणि वक्त्या संध्या शहापुरे यांनी ओघवत्या शैलीत मराठी भाषेची व्याप्ती समजावून सांगितली आणि मराठी भाषेच्या विकासासाठी सर्व मराठी बांधवांच्या एकत्रिक प्रयत्न करण्याचा आग्रह धरला. कार्यक्रमाला मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा मिळाल्याच्या आनंद सोहळ्यात साहित्य परिवारा बरोबरच बोईसर सांस्कृतिक मंडळ, बोईसर ब्राह्मण संघ, पत्रकार मंच, पर्यावरण दक्षता मंच, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शैक्षणिक संस्था इत्यादी समाजाच्या विविध स्तरातील प्रतिनिधींचा सहभाग होता