Palgahr News | वस्त्रोद्योग प्रकल्पाविरोधात माहीम केळवेकरांचा आक्रोश

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; प्रकल्प रद्द करण्याची प्रशासनाकडे एकमुखी मागणी
Palgahr News
वस्त्रोद्योग प्रकल्पाविरोधात माहीम केळवेकरांचा आक्रोशInstagram
Published on
Updated on

पालघर : पालघर तालुक्यात येऊ पाहणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या व स्त्रोद्योग प्रकल्पाविरोधात माहीम व केळवे गावातील नागरिकांनी आक्रोश करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. निलायन्स इंडस्ट्रीसाठी माहीम व टोफराळे येथील जमीन देण्यात येऊ नये व हा प्रकल्प रद्द करावा, अशी एकमुखी मागणी मोर्चेकरी यांनी प्रशासनाकडे केली.

प्रकल्पामुळे वायू, जल प्रदूषण होणार

Summary

वस्त्रोद्योग प्रकल्पसोबत रासायनिक प्रक्रिया करून धागा तयार करणारे उत्पादन प्रकल्प येथे उभे राहणार आहेत. त्यामुळे वायू, जल प्रदूषण होणार आहे. याचा विपरीत परिणाम निसर्ग समृद्ध केळवे माहीम गावावर होणार असल्याने हा प्रकल्प नको असल्याची भूमिका येथील गावकऱ्यांनी घेतली आहे. या मोर्चात केळवे व माहीम ग्रामपंचायत कार्यकारणी, गावातील लोकप्रतिनिधी, विविध कार्यकारी संस्था, मच्छीमार संस्था, शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, आदिवासी, स्थानिक भूमिपुत्र, गावकरी आदी मोठ्या संख्येने सामील झाले होते.

पालघर तालुक्यातील गादीम व टोकराळे परिसरात असलेली ८८० एकर सरकारी जमीन रिलायन्स इंडस्ट्रीला वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक निनास महामंडळातर्फे ना जमिनीच्या भूसंपादनासाठी मंत्रालय स्तरावरील निर्देशानुसार जोरदार हालचाली सुरू होत्या. शासन प्रशासन ही जागा रिलायन्स इंगस्ट्रीला देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहेत, वस्त्रोद्योग प्रकल्प येथे आल्यास पर्यावरणासह निसर्ग समृद्ध केळवे माहीम बेचिराख होईल व येथील पर्यटन व्यवसायाला उतरती कळा लागेल, असे सांगत या वस्त्रोद्योग प्रकल्पाविरोधात माहीम व केळवे गावाने बंड पुकारले होते.

गावांमध्ये प्रकल्प विरोधात जनजागृती करत या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बैठकाही आयोजित केल्या होत्या, गावातील विविध संस्था, नागरिक, ग्रामपंचायत यांनी पुढाकार येत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी मंगळवारी मोर्चाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयावर केले. त्यानुसार हजारो मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. व हा वस्त्रोद्योग प्रकल्प रद्द करा अशी एकमुखी मागणी केली.

संबंधित संस्थेकडे जागेचा प्रत्यक्ष ताबा नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून २ ऑगस्ट २००८ रोजी नोंदगी केलेल्या महिकावती बहुउद्देशीय व वनौषधी उत्पादन सहकारी संस्था मर्यादित या १०१ सदस्य असणाऱ्या शिक्षण असणान्या संस्थेते राज्य शासनाकडे भूमीहीन अल्पभूधारक व अनुसू‌न्नित जमातीच्या समाज बांधवांसाठी जागा मिळणासाठी अर्ज केला होता. त्या अनुषंगाने ३१ जुलै २००९ रोजी एस विल्हाधिकारी ठाणे यांनी जागेच्या मोरणीसाठी राहम जमा व्लण्यासंदर्भात आदेश दिला होता, त्यानुसार भागीधारकांनी वर्गणीतून अडीच लाखांपेक्षा अधिक राक्कम जमा केली. त्यानंतर या जमिनीने भूमिअभिलेख विभागाकडून प्रत्यक्ष मोजणी झाली. मात्र संबंधित संस्थेकडे जागेचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला नाही.

शासकीय जागांमध्ये टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे विचाराधीन

पालघर तालुक्यात दुग्ध व्यवसाय विभागाकडे टोकराळे (केळवे रोड) येथील सर्वे नंबर ६, ८, १०, ११, १२अ, १३, १४, ३१, ३३व ३४ मधील ११२ हेक्टर व माहीम गावातील सर्वे नंबर ८३५/१ (६३ हेक्टर) व ८३६ (१११ हेक्टर) या जागांसह लगतच्या भागातील शासकीय जागांमध्ये टेक्स्टाईल पार्क उभारण्याचे विचाराधीन आहे.

जमीन अनेक दशकांपासून होती अंजुमन ट्रस्टकडे

प्रस्तावित वस्त्रोद्योग प्रकल्पाला देण्यात येणारी जमीन अनेक दशकांपासून अंजुमन ट्रस्टकडे होती. यासंदर्भात १९८५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेत (सिविल अपील क्रमांक ४५२/१९८५) न्यायालयाने २५ जुलै १९९१ रोजी दिलेल्या आदेशामध्ये अंजुमन ट्रस्टचा ताब्यात असलेल्या एकूण २२३४ एकर क्षेत्रफळाच्या जमिनीपैकी १३४० एकर ही जागा महाराष्ट्र जमीन अधिनियम १९६१ अन्वय अतिरिक्त ठरवली गेली होती. या आदेशात या अतिरिक्त ठरवलेल्या जमिनीपैकी ४४९ एकर जागा ही भूमिहीन घटकांना वाटप करण्यासाठी सरकारजमा करण्याचे आदेश दिले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news