वानिवडे : वसईतील शेतकरी यंदा रतीच्या पावसामुळे पुन्हा नडचणीत आले आहेत. खरिपाच्या बात कापणीचा हंगाम परतीच्या वसामुळे लांबला आहे. त्यामुळे ब्बी शेतीचे वेळापत्रकही विस्कळीत होणार आहे. शेतकऱ्यांच्या आधीच प्रचलेल्या उत्पन्नात आणखी घट ण्याची भीती निर्माण झाली आहे. अलिकडच्या काही वर्षांपासून नहरी पावसामुळे शेतीचे वेळापत्रक तत बिघडत असल्याने शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर हा वातावरणातील बदल गंभीर परिणाम ठरणारा आहे.
गेल्या काही वर्षांपासून पाऊस नियमित वेळेत न आल्याने भातशेती हंगाम उशिरा सुरू होत आहे. यावर्षीही हवा तसा पाऊस जूनच्या शेवटाला उगवला, ज्यामुळे पेरणीसाठी उशीर झाला. त्यांनंतर खरिपाचा मध्याला बेताचा पाऊस झाल्याने खणणी, चिखळणी, आवणी चांगली झाली, त्यांनंतरही पाऊस बरा झाल्याने भात पिकांनी चांगलीच जोमदार उभारी घेऊन नेमक्या कापणीच्या वेळी सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना सोनेरी झालेली भात कापणी थांबवावी लागली आहे. सद्ध्या रोज संध्याकाळी सोसाट्याचा वारा आणि पाऊस बरसत असल्याने शेतातील उभे हातात आलेले पीक आडवे झाले असून खाचरात साचलेल्या पाण्यात भिजून गेले आहे. तर अनेक ठिकाणी पडलेल्या पिकांना मोड आले आहेत.
आताच्या स्थितीनुसार आक्टोबरचा शेवट सुरू झाला असूनही पावसामुळे कामे लांबल्याने नोव्हेंबर शेवटपर्यंत कापणी हंगाम राहण्याची शक्यता आहे. यामुळे उन्हाळी शेतीची तयारीही उशिरा सुरू होणार आहे, ज्याचा घंट फटका शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर बसणार आहे. उन्हाळी शेतीतून शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळतो, पण भातशेतीचा हंगाम लांबल्याने त्यातही अडचणी येत आहेत. वेळीच भात कापणीची प्रक्रिया पूर्ण पूर्ण न झाल्यास उन्हाळी शेतीचा हंगामही पुढे ढकलला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता रब्बीच्या चिंतेचेही वातावरण आहे.