Palghar murder | सोमटा येथे पत्नीची निर्घृण हत्या; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल!

Palghar murder | सोमटा येथे पत्नीची निर्घृण हत्या; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल!
Published on
Updated on

पुढारी वृत्तसेवा : पालघर तालुक्यातील सोमटा येथील धिंडापाडा परिसरात एका विवाहित महिलेची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी कासा पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माया रमण वनगा (रा. सोमटा, धिंडापाडा, ता. पालघर) या महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मयत महिला आणि आरोपी हे पती-पत्नी असल्याचे समोर आले.

दि. 20 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजण्यापूर्वी कोणत्यातरी कारणावरून झालेल्या वादातून आरोपी रमण राजू वनगा याने अज्ञात हत्याराने पत्नीच्या डोक्यावर, कानावर, कपाळावर वार करून गंभीर दुखापत केली. या मारहाणीत माया वनगा यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी सचिन लक्ष्मण खेवरा (वय 21, रा. वाडाखडकोना, पाटीलपाडा, ता. पालघर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 103(1) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर महेर आणि पोलीस निरीक्षक अमर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही करण्यात आली.

दरम्यान, आरोपी पती अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे सोमटा परिसरात खळबळ उडाली असून कासा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news