Mokhada Crime | अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मोखाडा तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मध्य वैतरणा धरण परिसरात एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आला
 Elderly Man Dead Body
मृतदेह www.pudhari.newsfile Photo
Published on
Updated on

Mokhada Elderly Man Dead Body

खोडाळा : मोखाडा तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायत हद्दीतील मध्य वैतरणा धरण परिसरात एका अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.

मोखाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य वैतरणा धरणाच्या फुगवटा परिसरातील एका मोठ्या दगडाशेजारी हा वृद्ध मृतावस्थेत आढळून आला. स्थानिकांकडून माहिती मिळताच मोखाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मोखाडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

 Elderly Man Dead Body
Palghar news | भाडेकरू बांगलादेशी निघाले तर घरमालकावरच गुन्हा

मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू असून, संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी मोखाडा पोलीस ठाण्याशी ८२३७४७११२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी केले आहे.

दरम्यान, मध्य वैतरणा परिसर हा बहुतांश वेळा निर्मनुष्य असल्याने या भागाचा वापर प्रेतांची विल्हेवाट लावणे तसेच इतर बेकायदेशीर कृत्यांसाठी होत असल्याच्या घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कारेगाव ग्रामपंचायतीने कारेगाव बसस्थानक परिसरात दोन्ही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. मात्र, नेटवर्कच्या अभावामुळे हे कॅमेरे अनेकदा बंद अवस्थेत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

 Elderly Man Dead Body
Palghar News: जंगलातील ‌‘कारवी‌’ ठरतेय वनवासींचा आधार

या परिसराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता सुरक्षा व्यवस्थेत वाढ करून प्रभावी देखरेख यंत्रणा उभारावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिका व ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news