palghar leopard search | बिबट्याच्या शोधासाठी पालघरमध्ये वनविभागाची सहा पथके तैनात

तंत्रज्ञानाच्या आणि श्वानाच्या मदतीने शोध मोहीम
palghar leopard search
पालघरमध्ये वनविभागाची सहा पथके तैनात करण्यात आलीpudhari photo
Published on: 
Updated on: 

पालघर शहर : पालघर शहराच्या पूर्वेस नवली, विनायक धाम आणि आसपासच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. यामुळे परिस-रातील नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपवनसंरक्षक (प्रादेशिक) डहाणू आणि सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक) पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली, वनपरिक्षेत्र अधिका (प्रादेशिक) पालघर यांच्या नियंत्रणात सहा स्वतंत्र शोध पथके तयार करण्यात आली आहेत. बिबट्याला पकड ण्यासाठी त्याचा अधिवास शोधण्यासाठी वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर दिवस-रात्र गस्त घालून परिसरावर लक्ष ठेवून आहेत.

palghar leopard search
Galai Devi Temple: हरवलेली मौल्यवान वस्तू पुन्हा मिळते, अशी श्रद्धा! नावजेच्या गैलाई देवीचे महत्त्व जाणून घ्या

ही शोधमोहीम केवळ पारंपरिक गस्तीवर अवलंबून नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञा नाचाही प्रभावी वापर केला जात आहे. विनायक धाम परिसराभोवती एक हजार मीटरच्या परिघाचे डिजिटल नकाशे तयार करण्यात आले आहेत. GPS च्या मदतीने हा परिसर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विभागून प्रत्येक पथकाला स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे. वनविभागाचे जुने नकाशे आणि अभिलेख, जंगलक्षेत्राच्या सीमा, बिबट्याला लपण्यासाठी योग्य अशी झुडपांची आणि दाट गवताची ठिकाणे, नदी-नाले, ओढे तसेच नागरिकांकडून माहिती मिळालेली ठिकाणे यांचा बारकाईने अभ्यास करून पथके सर्वत्र शोध घेत आहेत.

palghar leopard search
jawhar pwd scam|जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागात आता एफडीआर घोटाळा?

बिबट्याचे पायांचे ठसे म्हणजेच पगमार्क, विष्ठा, केस, झाडांवरील ओरखडे अशा प्रत्येक खुणेची नोंद शास्त्रीय पद्धतीने केली जात आहे. परिसरातील सोसायट्या, दुकाने आणि रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. मिळालेल्या प्रत्येक माहितीची तात्काळ पडताळणी करून त्यानुसार पुढील कार्यवाहीची दिशा ठरवली जात आहे. शोध मोहिमेमध्ये श्वानाचा देखील उपयोग करण्यात येत आहे.

बिबट्याचा वावर आढळून आलेल्या परिसरात वनविभागामार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. वनविभागाच्या पथकातील कर्मचारी गावपाडे, सोसायट्या आणि वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत. बिबट्याविषयी असलेली भीती कमी करून योग्य खबरदारीची माहिती देणे, हा या संवादाचा उद्देश आहे. वनविभाग प्रत्येक क्षणी सतर्क आहे. तरीही बिबट्या हा वन्यप्राणी असल्याने तो अचानक समोर येण्याची किंवा हल्ला करण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. जंगलात लाकूडफाटा, चारा किंवा झाडांच्या फांद्या आणण्यासाठी जाताना एकट्याने आणि अंधारात जाऊ नये. लहान मुलांना अंगणात किंवा घराबाहेर कधीही एकटे सोडू नये.

शाळकरी मुलांनी शाळेत जाताना आणि घरी परतताना गटानेच जावे आणि शक्य असल्यास मोठ्या व्यक्तींनी त्यांच्यासोबत राहावे. वृद्ध नागरिकांनीही संध्याकाळनंतर घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी.

बिबट्या दिसल्यास घाबरून न जाता संयम राखणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचा पाठलाग करू नये, त्याला दगड मारू नयेत किंवा गर्दी करून त्याला घेरू नये, कारण अशा वेळी तो बिथरून उलट हल्ला करू शकतो. त्याच्यासमोर खाली वाकू नये. त्याच्याकडे पाठ न फिरवता हळूहळू मागे सरकत सुरक्षित ठिकाणी जावे. बिबट्याची पिल्ले आढळल्यास त्यांना हात लावू नये, उचलू नये, त्यांचे फोटो किंवा सेल्फी काढू नयेत. अशा वेळी तात्काळ वनविभागाला कळवावे.

बिबट्या दिसणे, त्याच्या पायांचे ठसे आढळणे किंवा पाळीव प्राण्यांवर हल्ला होणे अशी कोणतीही घटना घडल्यास जवळच्या वनरक्षक किंवा वनपाल यांना, अथवा वनवि-भागाच्या १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन वनविभागा मार्फत नागरिकांना करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news