Palghar News | जव्हारमध्ये शेतकऱ्यांना खतटंचाईचा फटका; बियाणे घेतल्याशिवाय खतं देण्यास कृषी सेवा केंद्राचा नकार!

Palghar News | जव्हारमध्ये शेतकऱ्यांना खतटंचाईचा फटका; बियाणे घेतल्याशिवाय खतं देण्यास कृषी सेवा केंद्राचा नकार!
Published on
Updated on

जव्हार : जव्हार तालुक्यात खरीप हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांना रासायनिक खतांच्या उपलब्धतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, जव्हार तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्र दुकानदारांकडून खते देण्यास नकार दिला जात आहे, ज्या शेतकऱ्यांनी त्या त्या कृषी दुकानदारांकडून बियाणे, औषधे घेतले आहेत, आणि त्यांच्याकडे बियाणे खरेदीची पावती दाखवल्याशिवाय खत मिळत मिळणार नाही, असे कृषी सेवा केंद्र दुकानदारांकडून बोलले जात आहे, त्यामुळे शेकडो शेतकरी भाताची पेरणी करून खते मिळत नसल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. हे कृषी सेवा केंद्र दुकानदार त्या शेतकऱ्यांनी आपल्या दुकानातून याआधी बियाणे खरेदी केले आहे का? हे बघूनच हा कृषी सेवा केंद्र दुकानदार खते देत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जव्हार तालुक्यात एकूण 13 कृषी बियाणे सेवा केंद्रे असून, प्रत्येक खते, बियाणे, औषधे दुकानदार आपल्या मर्जीने खतं विक्री करत असल्याचे शेतकरी बोलत आहे. याकडे तालुका कृषी विभागाने वेळीच लक्ष घालून शेतकऱ्यांची खताची अडचण दूर करावी अशी मागणी आहे, त्यातच काही कृषी खते, बियाणे, दुकानदारांची गोडाऊने जव्हार शहर सोडून आजुबाजूच्या पाड्यावर आहेत, त्यांच्या दुकानात खतं असूनही खेड्यापाड्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना स्पष्ट नकार देत आहेत, मात्र शेतकऱ्यांनी त्यांच्याच दुकानातून बियाणे खरेदीची पावतीची पावती असेल तरच त्या शेतकऱ्यांना लगेच खंत मिळते, आणि काही शेकडो शेतकरी तोंड आपटत निघून जातात, अनेक शेतकऱ्यांना हेलपाटे मारून दुकाने फिरण्याची माघारी जाण्याची वेळ आली आहे.

कृषी सेवा केंद्र खत, विक्रेते त्यांच्या दुकानातून बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच उभे करतात खत देत आहेत. केवळ खताची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची तक्रार आहे, यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक ते खत वेळेवर मिळत नसून पेरणीनंतरच्या पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकाराची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन खतांचा पुरवठा सुरळीत करावा आणि विक्रेत्यांकडून होत असलेल्या कथित सक्तीची चौकशी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत, संबंधित शेतकरी, खत विक्रेते आणि कृषी विभागाने अन्य शेतकऱ्यांची बाजू घेणे योग्य ठरेल, अशी मागणी बियाणे खरेदी न केलेले शेतकरी बोलत आहेत.

आम्ही काही शेतकऱ्यांनी अगोदरच बाहेरून बियाणे घेतल्यामुळे आमच्याकडे जव्हार मधील कृषी दुकानदारांची बियाणे खरेदी केल्याची पावती नसल्यामुळे आम्हाला खत मिळत नाही, हे योग्य नाही, तर काही शेतकऱ्यांकडे त्यांच्या दुकानांची बियाणे खरेदीची पावती असूनही खत मिळत नाही. याकडे कृषी विभागाने वेळीच लक्ष घालून शेतकऱ्यांची अडचण दूर करावी अशी आमची मागणी आहे.

प्रकाश धनगरे- शेतकरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news