Palghar Ganesh festival : पालघर जिल्ह्यात बाप्पांच्या आगमनाच्या तयारीची लगबग

गणेशमूर्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात, कारागीर हात फिरवताना मग्न
Palghar Ganesh festival
Palghar Ganesh festivalpudhari photo
Published on
Updated on

जव्हार : तुळशीराम चौधरी

अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोस्तावासाच्या तयारीची लगबग सर्वत्र सुरू झाली असून पालघर जिल्ह्यातही बाप्पाच्या मुर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. शहरातील अनेक सार्वजनिक गणेशोस्तवाच्या मुर्त्यां अगोदरच मंडपांमध्ये दाखल झाल्या आहेत .तर घरुगुती मुर्त्यांचे काम अखेरच्या टप्प्यात सुरू आहे. तर बाजारपेठांमध्येही सजावटीचे साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून येत आहे.

गणेशभक्त व मंडळे लाडक्या गणरायाच्या आगमनाची चाहूल लागल्याने गणेशोत्सवाची तयारी आता जोरात सुरू झाली आहे. जव्हार शहरासह तालुक्यात विविध आकारांच्या व आकर्षक गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून, मंडळे सजावट सुुरू व्हायला लागले आहेत. तर शहरातील अनेक मूर्तिकारांकडे गणेशमूर्तींचे रंगकाम अंतिम टप्प्यात हात फिराताना दिसत आहेत.

Palghar Ganesh festival
Kalyan Shil Road traffic : रक्षाबंधनच्या उत्साहावर कल्याण-शीळ कोंडीचे सावट

काही कारागीर रायगड जिल्ह्यातील पेन तसेच पालघर जिल्ह्यातील हमरापूर परिसरातून कच्च्या गणेशमूर्ती जव्हार, मोखाडा आणि विक्रमगड तालुक्यात आणतात तर काही कारागीर जव्हार शहरातच मुर्ती बनवतात, त्यानंतर स्थानिक कारागिरांकडून या मूर्तींना आकर्षक रंगरंगोटी करून अंतिम स्वरूप दिले जाते. डायमंड, चमकी, सिल्वर ऑइल रंगांचा वापर करून बाप्पाच्या मूर्ती अधिक आकर्षक करण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे, जव्हार शहरात अंबिका चौक, गांधी चौक, तारपा चौक येथे मंडळांनी बुकिंग केलीेल्या मृतींवर मृती कलाकार शेवटचा हात फिरताना दिसत आहेत.

जव्हार तालुक्यात घरगुती गणपतींची संख्या मोठी असून, शहरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे गणेशमूर्तींना दरवर्षी चांगली मागणी असते, यंदाही सार्वजनिक मंडळांकडून गणेशमूर्तींचे बुकिंग सुरू झाले असून, उत्सवाच्या दिवशी मूर्ती मंडपात नेण्यासाठी कारागिरांकडून अंतिम कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत.

Palghar Ganesh festival
Mumbai municipal school security : शाळा आहे की बकऱ्यांचा अड्डा..!

घरगुती गणपतींसाठी छोट्या मूर्तींना पसंती.. घरगुती गणेशमूर्तींची स्थापना करणाऱ्या नागरिकांकडून यंदाही लहान आकाराच्या मूर्तींना पसंती दिली जात आहे. घरातील उपलब्ध जागा, सजावट आणि विसर्जनाची सोय लक्षात घेऊन विविध आकारांच्या छोट्या मूर्ती तयार करण्यात येत आहेत विशेष म्हणजे साईनाथ नवले या कलाकाराने गणपतीच्या मुर्तीत आपल्या रंगकामाने जिवंतपणा भरला असुन तेथील कला केंद्रावरुन जाताना भावीक पाच मिनिटे थांबून मुर्ती बघत आहेत तर जव्हार शहरात मुर्तीकार यतीन भोये यांनी शाडुच्या मुर्ती बनवुन विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news