Palghar Crime | तरुणीच्या विनयभंगाच्या निषेधार्थ कासा-चारोटी बंद; आरोपी जेरबंद

डहाणू तालुक्यातील कासा परिसरात विनयभंग केल्याच्या कथित घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट
Dahanu Molestation Case
Dahanu Molestation Case AI Photo
Published on
Updated on

Dahanu Molestation Case

कासा: डहाणू तालुक्यातील कासा परिसरात एका २० वर्षीय तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याच्या कथित घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी कासा व चारोटी परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळत निषेध व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी तिच्या राहत्या घरी झोपलेली असताना इजाज नवाब खाटीक (वय ३१, रा. बराडपाडा, कासा) याने घरात प्रवेश करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. तरुणीने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील महिला व नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे स्थानिकांनी सांगितले.

Dahanu Molestation Case
Palghar Crime | गुजरातहून येणारा तब्बल ३८ लाखांचा गुटखा जप्त; गुटखा माफियांना कोणाचा आशीर्वाद?

या प्रकरणी कासा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी समीर मेहेर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, डहाणू परिसरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे नागरिकांमध्ये आधीच अस्वस्थतेचे वातावरण होते. त्यातच कासा येथे घडलेल्या या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्रामीण भागासह शहरी भागातही महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे.

Dahanu Molestation Case
Palghar Crime : तलासरीत प्रेमसंबंधातून हत्या

घटनेच्या निषेधार्थ कासा व चारोटी परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आवाहन केले.

या घटनेनंतर कासा परिसरात तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news