Palghar Crime | खोडाळा येथील जगदंबा मंदिराच्या दानपेटीवर चोरट्यांचा डल्ला

खोडाळातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मंदिरात चोरी, चोरटा सीसीटीव्हीत कैद
Palghar Crime
Palghar Crime
Published on
Updated on

खोडाळाः मोखाडा तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा येथे लहान मोठ्या चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे.यापूर्वी दुकाने,घरफोडी तसेच चालू वीज पुरवठ्यातून विद्युत जनित्र चोरी झाल्याच्या घटना ताज्या असतानाच.आता चोरट्यांनी थेट गावातील बाजारपेठेत असलेल्या जगदंबा मंदिरातील दान पेटीच चोरून पोबारा केला आहे.ही दानपेटी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे.यापुर्वीही याच मंदिरातील देवीच्या दागिन्यांची चोरीची घटना घडली होती.मुख्य बाजारपेठेत आणि सकाळी राबत्याच्या वेळेसच ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.

मोखाड्यातील खोडाळा बाजारपेठेत मागील ४/५ वर्षापासून सतत चोरीच्या घटना घडत आहेत. मागील महिण्यात विद्युत जनित्र चोरी ची घटना घडली आहे. त्या अगोदर घरफोडी तसेच दुकाने फोडून चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर पोलीसांनी गावात रात्रीची गस्त वाढवली आहे. रात्री बारापासुन सकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस गस्त घालत असतात.

मात्र, चोरट्याने गावातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या जगदंबा मंदिरात शनिवारी 16 मे रोजी सकाळी सात ते सव्वासातच्या दरम्यान, मंदिरातील दान पेटी चोरल्याची घटना सीसीटीव्हीत दिसुन आली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्याने मंदिरात जाऊन प्रथम देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्याने मंदिरातील छोटी दान पेटी चोरून गोणीत भरून नेल्याचे दिसत असून एका पायाने तो अधु असल्याचे कॅमेर्‍यात दिसत आहे.

या घटनेची गंभीर दखल पोलीसांनी घेतली असुन चोरट्यांचा शोध सुरू केल्याची माहिती खोडाळा पोलीसांनी दिली आहे. मात्र, या मंदिरात चोरीची दुसरी घटना असल्याने तसेच यापूर्वी भैरवनाथ मंदिर,शिव मंदिर या दोन्हीही मंदिरांमध्ये सातत्याने चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.तर मागील काही वर्षांपूर्वी शिव मंदिरातीलही दानपेटी चोरुन नेण्याचा प्रताप अज्ञात व्यक्तींनी केलेला होता त्यामुळे आता तालुक्यात मंदिरही सुरक्षित नसल्याच्या संतप्त लोकभावना व्यक्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news