Khair wood smuggling Palghar: खैर तस्करीचा पर्दाफाश, ७७ ओंडके व टेम्पो जप्त; चालक फरार

Palghar crime : वन विभागाचा ८ किलोमीटर पाठलाग करून कारवाई
Khair wood smuggling Palghar: खैर तस्करीचा पर्दाफाश, ७७ ओंडके व टेम्पो जप्त; चालक फरार
Published on
Updated on

खानिवडे : भाताणे वनक्षेत्रातील मेढे परिमंडळात अवैधरीत्या खैर लाकडाची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर वन विभागाने रविवारी (दि. २७) रोजी पहाटे धाडसी कारवाई करत ७७ खैर ओंडक्यांसाह वाहन जप्त केले. मात्र, अंधाराचा फायदा घेत टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

वन विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मेढे परिमंडळातून अवैध खैर वृक्षांची वाहतूक होणार असल्याचे समजताच अधिकाऱ्यांनी सापळा रचला. पहाटेच्या सुमारास टाटा कंपनीचा इंद्रा टेम्पो (क्र. एमएच-४७/एएस-२४६०) संशयास्पदरीत्या येताना दिसला. वाहन थांबविण्याचा इशारा देऊनही चालकाने टेम्पो भरधाव वेगाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला. सुमारे ७ ते ८ किलोमीटर पाठलाग केल्यानंतर वन विभागाच्या पथकाने टेम्पो ताब्यात घेतला. मात्र चालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. ही छुपी तस्करी सहज दिसू नये म्हणून भाजीपाला वाहतुकीत वापरात येणारे कॅरेट दिसावेत असे टेम्पोमध्ये खैर ओंडके भरले होते.

Khair wood smuggling Palghar: खैर तस्करीचा पर्दाफाश, ७७ ओंडके व टेम्पो जप्त; चालक फरार
Sindhudurg Khair Wood Smuggling | पत्रादेवी येथे 14 लाखांचे खैर लाकूडसह टेम्पो जप्त

दरम्यान जप्त करण्यात आलेल्या टेम्पोमध्ये खैर लाकडाचे ७७ तुकडे असून त्यांचे घनफळ १.२८४ घनमीटर आहे. या लाकडाची अंदाजे किंमत ₹१४,८९२ इतकी असल्याची माहिती वन विभागाने दिली. या प्रकरणी वन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार चालकाचा शोध आणि पुढील तपास सुरू आहे.

Khair wood smuggling Palghar: खैर तस्करीचा पर्दाफाश, ७७ ओंडके व टेम्पो जप्त; चालक फरार
illegal khair wood transport: अवैध खैरलाकूड वाहतुकीचा पर्दाफाश; माणगावात वनविभागाची कारवाई

ही कारवाई उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर आणि उपविभागीय वनाधिकारी अमित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मनीष महाले, वनपाल आर. एस. माळगावी, व्ही. जी. राख, एन. बी. खुळपे, वनरक्षक एस. एस. पवार, एल. एल. हमरे, डी. एन. सावरा तसेच चंदन खानिवडेकर यांनी संयुक्तपणे पार पाडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news