

जव्हार : जव्हार तालुक्यातील हिरडपाडा, जामसरआणि वावर वांगणी तलाठी सजा हद्दीतील सीताराम इंधन आणि गजानन जोहरे ह्या दोघा तलाठ्यांना पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी उशीरा घडली असून, याबाबत संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार त्या हफ्तेखोर तलाठ्यांना तीन दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आल्याचे समजते.
ह्या हफ्तेखोर तलाठ्यांकडून घरकुल साठी रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना नेहमीच त्रास देणे, आणि पैसे वसूल करण्याचे काम हे तलाठी करत होते, मात्र काही गरीब ट्रॅक्टरवाल्यांनी हिम्मत लाचेसंबधी तक्रार केली. या तलाठ्यांची दोन ट्रॅक्टरांची 40 हजाराची मागणी होती, मात्र त्यापैकी 20 हजार देण्याचे ठरले आणि पैसे नसल्याने राहिलेले 20 हजार नंतर देऊ असे सांगितले. या ट्रॅक्टर मालकांनी पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क करून त्या भ्रष्ट तलाठ्यांना अटक करण्यात आली आहे.
हिरडपाडा व जामसर तसेच वावर वांगणी ह्या दोघां सजांकडून नेहमीच हे तलाठी घरकुल लाभार्थी यांना त्रास देण्याचे काम करीत असल्याचे समजते, यामुळे या भागातील ट्रॅक्टर मालक आणि चालकांना नेहमीच त्रास देऊन हफ्तेखोरी वाढल्याने त्यांनीच याबाबत तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली होती, त्यानुसार पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून या लाचखोरांना पकडल्याचे पकडून तीन दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली आहे. सदर भ्रष्ट तलाठ्यांना भिंवडी कोर्टात दाखल करण्यात आले आहे.
जव्हार तालुक्यात सरकारी यंत्रणा किती भ्रष्टाचाराने बरबटलेली असून, हेच या घटनेवरुन स्पष्ट होत आहे. या कारवाई नंतर भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत. ग्रामीण भागात रोजगारासाठी अनेक सर्वसामान्य नागरिक कर्ज काढून ट्रॅक्टर किंवा वाहतूक करणारी वाहने घेत आहेत. यातून रोजगार निर्माण करून उपजीविका भागवणे हा उद्देश असतो. मात्र तालुक्यातील काही महसूल कर्मचाऱ्यांकडून कायद्याचा धाक दाखवून अनेकदा हफ्ते घेत असल्याची चर्चा होती. यातूनच वैतागलेल्या काही चालक मालकांनी याबाबत तक्रार केल्याचे दिसून येत आहे यातूनच ही कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती आहे, बुधवारी
रात्री उशिरा संबंधित ट्रॅक्टर मालकांकडून रोख रक्कम 20 हजार रुपयांची रोख घेताना रंगेहात तलाठ्यांना पकडण्यात आले आहे, सध्या ग्रामपंचायत हद्दीत गावोगावात घरकुलची काम सुरू आहेत, त्यांना देखील रेतीच बांधकाम करावे लागते, मात्र असा अडचणी असतील सर्व सामान्य घरकुल लाभार्थ्यांनी घर बांधायचे कसे? असा मुद्दा घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.