

बोईसर : बोईसर येथील एका कार शोरूमने ग्राहकाची फसवणूक केल्याप्रकरणी शोरुम व्यवस्थापकाने स्पष्टीकरण दिले आहे. आमच्याकडे आलेल्या ग्राहकाने विमा क्लेमद्वारे आपल्या नवीन कारसाठी साइड मिरर मागवला होता. नवीन आरसा उपलब्ध होईपर्यंत शोरूमने दुसऱ्या गाडीचा आरसा बसवून दिला, असा खुलासा त्यांनी दिला आहे.
ग्राहकाची फसवणूक झाल्याच्या या वृत्तावर शोरुमने स्पष्टीकरण दिले आहे. कंपनीने म्हटले आहे की,“एसटीएस ह्युंदाई” हे बोईसर मधील ह्युंदाई कंपनीचे अधिकृत विक्री आणि सेवा देणारे २०१४ पासून डीलर आहेत. गेल्या दहा वर्षात सुमारे ५००० गाड्यांची विक्री व विक्रीनंतर सुमारे ५५००० गाड्यांची ची सेवा ( सर्व्हिसिंग)तत्परतेने देत आहोत. दिनांक १४/७/२५ रोजी एक ग्राहक प्रीतम आंबेकर ह्यांची कार क्र. Mh48DD5077 आमचे येथे साइड मिरर बदलण्यासाठी आले होते व त्या साठी इन्शुरन्स क्लेम करण्यात आला व सदर क्लेम हा इन्शुरन्स कंपनी ने मान्य केला. त्यानंतर गाडीचा पार्ट (साइड मिरर)उपलब्ध नसल्यामुळे तो आम्ही ऑर्डर केला परंतु तो पार्ट त्वरित उपलब्ध होत नसल्यामुळे व फक्त ह्या कारणासाठी गाडी वर्कशॉपला खोळंबून राहू नये म्हणून अल्काझार गाडी चा तसाच पार्ट तात्पुरता लाऊन देण्यात आला व तसे आंबेकर ह्यांना गाडीच्या डिलीवरी च्या वेळी सांगण्यात आले. त्यांच्या गाडीच्या पार्ट आल्यानंतर तो आम्ही लावून देऊ असे सांगितले व त्यांनी मान्य करून दिनांक २२/७/२६ रोजी ते गाडी घेऊन गेले. तसेच पार्ट उपलब्ध नसल्यामुळे झालेल्या तसदीबद्दल आम्ही दिलगिरी सुद्धा व्यक्त केली. तरी सुद्धा आंबेकर ह्यांनी आमच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत 'पुढारी'मध्ये दिनांक २३/७/२५ रोजी बदनामीकारक बातमी दिली. सदर वृत्त हे खोटे असल्याचे शोरुमने म्हटले आहे.