

जव्हार ः सोमवार, मंगळवार झालेल्या मुसळधार पावसामुळे सायवन ओझर मार्गावरील वावर पैकी बेहेडगाव येथे बुधवारी संध्यकाळच्या सुमारास बेहेडगाव येथे रस्त्याच्या मध्यभागी मोठी तडा गेल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला आहे, यामुळे रस्ता पूर्णपणे खचला असून, या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातून येणा-या वाहणांना माघारी फिरून जाण्याची वेळ आली, त्यामुळे त्या गावाकडील बेहेडगाव, सरोळीपाडा या गावातील ग्रामस्थांचा संपर्क तुटला, यामुळे गावातील लोकांनी लगेचचं शासनाची वाट न पाहता त्या गावातील लोकांनी एकत्र येत त्या तुटलेल्या रस्त्यावर दिवसभर दगड माती टाकून आपली ये-जा करण्याची अडचण भागाविली आहे.
बेहेडगावाजवळ मेनरोडवर मध्येच मोठा तडा गेल्यामुळे यामुळे गावातील विद्यार्थी, गरोदर माता व आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी हा मार्ग महत्त्वाचा असताना पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ काहीकाळ अडचणीत आले होते, तर वाहतूक पूर्ण ठप्प झाल्याने रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा आणि दैनंदिन गरजांची आवक-जावक बंद झाली होती.
बेहेडगाव येथील ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली असून, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ पर्यायी व्यवस्था करावी, पुन्हा पाऊस सुरु झाला की पुन्हा रस्ता तुटून तीच परिथिती होईल असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. यामुळे संपूर्ण रस्ता खचून खाली जाण्याच्या बेतात आहे, यामुळे रस्ता बंद झाल्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल झाले आहेत.