

विक्रमगड : श्रावण महिन्यापासुन सणांना सुरुवात झाली. हे सण जात नाही तोच महाराष्ट्राचे आराध्यदैवत गणेशोत्सव नुकताच उत्साहात पार पाडला. आता अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या नवरात्रीची लगबग सर्वत्र सुरू झाली आहे. दरम्यान नवरात्रीचे मुख्य आकर्षण असलेल्या दांडियासाठी तरुणाईची बाजारपेठामध्ये खरेदीसाठी गर्दी पहायला मिळत आहे. (Latest Palghar News)
नवरात्र अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असून कार्यशाळेमध्ये देवी मुर्तीवंर अखेरचा हात फिरवला जात आहे. तर बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. तर तरुणाईला वेध लागले आहेत ते आहे ते नवरात्रउसत्वाच्या दांडीयाचे. या पार्श्वभुमीवर सार्वजनिक मंडळाच्या हालचालींना वेग आला असुन वार्षिक सभा घेण्याकडे व दहा दिवसांवर आलेल्या नवरात्रोत्सवाच्या तयारीच्या विविध कार्यक्रमांच्या आरखाडयाची तयारी विक्रमगड व परिसरात सुरु झाली आहे.
रंगीलो म्हारो ढोलना.....,म्हारी मायसागरनी आवे......अशा विविध गाण्यांच्या तालावर नाचण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. शहरात व ग्रामीण भागात पित्रुआठवडा गेल्यानंतर येथे पुढील आठवडयात नवरात्रोत्सवाचे मंडप सजू लागतील.
नवरात्रोत्सवात डीजेच्या तालावर बेधुंद होवुन तरुणाई दांडीया रास व गरबा नृत्य या मंडपातून करतांना दिसणार आहे. नवरात्रोत्सवाच्या दिवशी मंडपात दुर्गामातेची मूर्ती ठेवुन तिची पूजा करण्यांत येते. तर रात्रभर फेर धरत तरुणाई गरबानृत्य सादर करते. याच बरोबर शहरात ठिकठिकाणी दुकाने सजु लागली आहेत. या दुकानांतुन दांडीया खेळण्यासाठी विविध प्रकारच्या आकर्शक दांडीया दिसू लागण्यास सुरुवात झाली आहे. नवरात्रोत्सवात विविध प्रकारची वेशभूशा करुन नृत्य करण्याची पध्दत आहे. असे फॅन्सीड्ेसही बाजारात उपलब्ध करुन दिले जातात.
नवरात्रोत्सव अवघ्या 10 दिवसांवर येवुन ठेपला असल्याने दांडीया रसिकांची आता पासुन खरेदीसाठी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. गाहकांच्या स्वागतासाठी विक्रमगडमधील बाजारपेठा सजण्यास सुरुवात झाली आहे.
बाजारात विविण प्रकारच्या दांडिया उपलब्ध असुन त्यांना आकर्षकक सजावट करण्यांत आलेली आहे. त्याच प्रमाणे दांडिया रसिकांची गुजराजी,राजस्थांनी पोशांखाना व ज्वेलरीला याकाळात अधिक पसंती असते.
लहांपासुन ते मोठयापर्यत विविध आकरांचे व विविध डिझाईनचे ड्रेस खरेदी केलेल जातात. महिला वर्ग आकर्षक साडया खरेदी करीतात त्याच प्रमाणे त्यांना मॅचिंग अशा लाखेच्या बांगडया व कानातील झुमके ही त्यांना ही या काळात अधिक पसंती दिली जाते. त्याच बरोबर देवीच्या आरास करण्यासाठी लागणारे साहित्यदेखील विक्रीला ठेवण्यात आले आहे. आता तरुणाईला ओढ लागली आहे ती नवरात्र उत्सवाची.