Palghar Employment Crisis : दिवाळी संपली, रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

मोखाड्यात स्थलांतराचे संकट होतेय गडद
Palghar Employment Crisis
Palghar Employment Crisispudhari photo
Published on: 
Updated on: 

खोडाळा : दीपक गायकवाड

दिवाळीचा उत्साह संपला. गावात काही दिवस आनंदाचे वातावरण होते, पण हाताला काम नाही, शेतात पाणी नाही आणि घरात पैसा नाही, या वास्तवाने मोखाडा तालुक्यातील अनेक कुटुंबांसमोर पुन्हा रोजगाराचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.त्यामूळे आता स्थलांतर आणि त्यातून उद्भवणारी वेठबिगारी, मुलांचं शिक्षण आदि प्रश्न आ वासून उभे राहणार आहेत.

दिवाळीनंतर कामाच्या शोधात शहराकडे जाणाऱ्या मजुरांची संख्या वाढत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध झाला तर स्थलांतर थांबेल, अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे मोखाडा तालुक्यात मुबलक रोजगार उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना आता अधिक ठळकपणे मांडली जात आहे.

Palghar Employment Crisis
Palghar Ashram School : आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ!

पूर्वीची मनरेगा योजना रद्द करून केंद्र सरकारने १ जुलै २०२६ पासून विकसित भारत - गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण), म्हणजेच व्हीबी-जी राम जी कायदा लागू केला आहे. या कायद्यांतर्गत पूर्वीच्या १०० दिवसांऐवजी प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षातून १२५ दिवसांच्या मजुरी रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे. मात्र मुळातच मुबलक रोजगाराची परवड असताना योजनेचे नाव बदलूनही परिस्थिती मात्र जैसे थे राहिली आहे.

महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत मजुरीचा दर ३१७ रुपये प्रतिदिन असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. तसेच राज्यात या योजनेत ३७५ प्रकारची कामे करण्याची परवानगी देण्यात आली आहे, यात जलसंधारण, विहीर, शाळा भिंत, शौचालय, गृहनिर्माण आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कामांचा समावेश आहे.

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत ६,७२८ कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी २९ सप्टेंबर २०२६ रोजी सांगितले होते. हा निधी महाराष्ट्र रोजगार हमी योजना, व्हीबी-जी राम जी आणि संबंधित यंत्रणांमार्फत उपलब्ध करण्यात आला आहे.

Palghar Employment Crisis
Tarapur MIDC Chemical Leakage : टँकरमधून रसायन रस्त्यावर; तारापूरच्या सुरक्षेचा पुन्हा प्रश्न !

या पार्श्वभूमीवर मोखाड्यासारख्या आदिवासीबहुल, डोंगराळ आणि पाणीटंचाई असलेल्या तालुक्यात या निधीतून प्रत्यक्षात किती कामे सुरू झाली, किती मजुरांना काम मिळाले आणि किती दिवस रोजगार मिळाला, हा खरा मुद्दा ठरत आहे.मोखाडा तालुक्याच्या अधिकृत एमआयएस अहवालानुसार कामांची यादी, चालू कामे आणि खर्चाची नोंद उपलब्ध आहे.

प्रशासनासमोरची आव्हाने...

कामांची मागणी आणि पुरवठा यातील तफावत: काम मागितल्यानंतर १५ दिवसांत काम मिळणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी मजुरांना वाट पाहावी लागत असल्याच्या तक्रारी आहेत, ग्रामसभेने मंजूर केलेली कामे, जलसंधारणाची कामे, वनराई बंधारे, रस्ते, चारा लागवड यासारखी कामे वेळेत सुरू झाली तर स्थानिक रोजगार वाढू शकतो, मजुरी थकली तर मजूर पुन्हा स्थलांतराकडे वळतो. त्यामुळे मजुरीचे वेळेत प्रदान हे स्थलांतर रोखण्याचे पहिले पाऊल ठरेल, प्रत्येक ग्रामपंचायतीत किती कामे मंजूर, किती सुरू, किती मजूर कामावर, किती मजुरी अदा, याची माहिती फलकावर आणि ग्रामसभेत जाहीर करणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.