डहाणू मतदार संघातून पुन्हा आमदार कॉ. विनोद निकोले यांना उमेदवारी घोषित...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या बैठकीत निर्णय
maharashtra assembly polls / महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
डहाणू मतदार संघातून पुन्हा आमदार कॉ. विनोद निकोले यांना उमेदवारी घोषित करण्यात आलीPudhari Photo
Published on
Updated on

कासा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून सर्वच राजकीय पक्षातील सत्ताधारी सह विरोधकांच्या ही जागावाटप अंतिम टप्प्यात आल्या असल्याचे सांगितले जात आहे.येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांसाठी कंबर कसली असून महाविकास आघाडीत असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची राज्य आणि जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करत सध्याचे डहाणू मतदारसंघाचे विद्यमान आमदार कॉ.विनोद निकोले हेच पुन्हा माकपा चे डहाणू विधानसभेचे उमेदवार असणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

maharashtra assembly polls / महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४
Maharashtra Assembly Polls : विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ करणार : जरांगे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news