Wildlife Census | तुंगारेश्वर अभयारण्यातील प्राणी गणनेत यंदा बिबट्या गायब : रानडुक्कर, ससे, सांबर, हरीण, माकड आदी प्राण्यांचा वावर कायम

Wildlife Census in Tungareshwar Vasai | वसई तालुक्यातील वसले आहे तुंगारेश्वर अभयारण्य
Wildlife Census in Tungareshwar Vasai
प्राणीगणनेसाठी तुंगारेश्वर अभयारण्यात ठिकठिकाणी मचाण उभारण्यात आली होती. Pudhari Photo
Published on
Updated on

खानिवडे : मुंबईच्या ऑक्सिजनची नळकांडी समजल्या जाणाऱ्या वसई तालुक्यातील विस्तीर्ण तुंगारेश्वर अभयारण्यात अनेक पशु पक्षांचा वावर, किलबिलाट व निसर्गरम्य वातावरण नेहमीच पर्यटकांना आकर्षित करीत आला आहे. या अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांचाही अधिवास असतो याचबरोबर बिबटे, रानडुक्कर, ससे, सांबर, हरीण , माकड, लंगूर ,साळींदर , रानमांजर व विविध पक्षी मनमुराद भ्रमंती करत असल्याचे मागील दोन वर्षांपूर्वी च्या गणनेत उघड झाले होते. मात्र मागच्या वर्षी प्रमाणे यंदाच्या वेळी ही या प्राणीगणनेत बिबट्याचे दर्शन झाले नाही. मात्र प्रत्यक्ष दर्शन आणि आवाजवरून विविध पक्षी आणि प्राण्यांचा वावर असल्याचे उघड झाले आहे.

तुंगारेश्वर अभयारण्याचा विस्तार हा एकूण आठ हजार पाचशे सत्तर हेक्टर क्षेत्रात आहे. हे क्षेत्र पारोळ, सातिवली , चिंचोटी, मांडवी, रेन्जऑफिस पर्यंत पसरले आहे. येथे हरणांची व रानडुक्करांची संख्या मोठ्या प्रमाणत आहे. या भागात कोरोनाच्या आगोदर प्राणिगणना करण्यात आली होती. यात बिबट्यांची संख्या वाढली असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला होता. कोल्हा , घोरपड, साप, लांडगे घुबड, घार , तुतारी, कुहुवा, पहाडी अंगारक, शिपाई बुलबुल, कवडे, महाभृंगराज, सुतार, मोर कोकीळ, मैना यासह विविध पक्षी प्राणी अभयारण्यात असल्याचे यंदा समजून आले आहे . एकीकडे वसई तालुक्यात सिमेंटचे जंगल वाढत असतांना तुंगारेश्वर अभयारण्य विविध वृक्ष, प्राणी, पक्षांनी बहरलेला आहे.

Wildlife Census in Tungareshwar Vasai
Water Hole Wildlife Census | पाणवठा आधारित प्राणी गणना बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीच का करतात ? ही पद्धत कुणी अंमलात आणली? जाणून घ्या

वनविभागाकडून वन्यजीव सप्ताह मोहीम देखील हाती घेत अभ्यारण्यासह प्राणी , पक्षांचे जतन करण्यासाठी जनजागृती देखील करण्यात येत आहे. दर बुद्ध पौर्णिमेला वनविभागाकडून प्राणिगणना केली जाते. मात्र सलग दोन वर्षे बिबट्याचे दर्शन झाले नसले तरी त्यांचा वावर असल्याचे सांगण्यात येत आहे . या अभयारण्यात एकूण २०० च्यावर प्राण्यांच्या जाती आहेत.

Wildlife Census in Tungareshwar Vasai
नाशिक : वनविभागाकडून काजवा महोत्सवाला नियमांचे कवच, पर्यटकांसाठी नियमावली जारी

कृत्रिम पाणवठे

तुंगारेश्वर अभयारण्यात अधिवास असणाऱ्या प्राण्यांना व पक्षांना पाणी पुरेसे मिळावे याकरिता चिंचोटी, तुंगारफाटा, सातिवली , पारोळ सह आजूबाजूच्या जंगलात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत उन्हाळ्यात धबधब्यात पाणी नसल्याने ही व्यवस्था करण्यात आली आहे. वन्यजीवांचा भ्रमणमार्ग सुरक्षित असावा याकरिता धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंती व जाळ्या लावण्यात आल्या आहेत

निसर्ग पर्यटन परिचय केंद्र

पारोळ व चिंचोटी या अभयारण्याच्या अखत्यारीत येणाऱ्या भागात निसर्ग पर्यटन परिचय केंद्र आहे. प्राणी , पशुपक्षी यांची संपुर्ण माहिती पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे तुंगारेश्वर अभयारण्याचा अभ्यास करणे सोपे जात आहे.

यंदा प्रत्यक्ष दिसलेले, चाहूल लागलेले प्राणी पक्षी पुढीलप्रमाणे

1. Wild Cat - वन्य मांजर ,

2. Owle (Owl) - घार / घुबड

3. Wild Boar - रानडुकर

4. Small Blue Kingfisher - छोटा निळा खंड्या

5. White Breasted Kingfisher - पांढऱ्या छातीचा खंड्या

6. Gray Langur - हनुमान लंगूर

7. Jungle Owlets - जंगल घुबडे

8. Plum Headed Parakeet - जांभळ्या डोक्याची पोपट

9. Monkey - माकड

10. Kuva Kombadi - कुणबी कोंबडी (किंवा स्थानिक जातीची कोंबडी)

11. Leaf Monkey - पान माकड

12. Peacock - मोर

13. Mongoose - मुंगुस

14. Black Cat - काळी मांजर

हे सर्व मिळून 37 प्राणी - पक्षी गणनेत आले आहेत. ही माहिती तुंगारेश्वर अभयारण्य अधिकारी राजश्री साळवे यांनी दिली आहे.

तुंगारेश्वर अभयारण्यातील सातीवली परिमंडळ विभागातील तुंगार हलाचे पाणी, वाघ्राळा घोटीचे पाणी , जूचंद्र पाझर तलाव , चिंचोटी परिमंडळातील चिंचोटी दहीहंडी , उत्तर चिंचोटी धबधब्या जवळ, चिंचोटी पश्चिम कामण तर माजीवली परिमांडळातील पेल्हारचे भातखिंड पाणी आणि पेल्हार डॅम च्या वेगवेगळ्या दोन ठिकाणी पाणवठ्यांवर हे निरीक्षण नोंदवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news