

खानिवडे : वसईच्या कामण विभागातील देवदल परिसरातील जाधव वाडीयेथील नैसर्गिक नाला भूमाफियांनी अतिक्रमण करून केलेल्या बांधकामामुळे निचरा बंद झाला आहे. त्यामुळे देवदल परिसरात यंदा पावसाचे पाणी तुंबणार आहे. त्याचा त्रास येथील नागरिकांना भोगावा लागणार आहे. यामुळे हे अतिक्रमण तात्काळ हटवून नाळा खुला करावा अशी मागणी येथील माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी तालुका तहसीदार आणि प्रभाग जीच्यासह आयुक्तांकडे एका पत्रकाद्वारे केली आहे.
यात त्यांनी गाव मौजे देवदल सर्व्हे नं ११/५/४ जाधववाडी लगत असलेल्या नैसर्गिक नाला बेकायदेशीर माती भराव करुन बंद केला आहे व अतिक्रमण केले आहे. सदर नाळा बंद झाल्याने आजूबाजूला असलेल्या वस्तीला आजूबाजूला असलेल्या वस्तीला त्याचा त्रास होणार आहे.
पावसाळ्या येथील नागरीकांच्या घरात पाणी जाऊन जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. यासाठी आपण प्रत्यक्ष पाहणी करुन भूमाफियांवर गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व सदर अतिक्रमण काढून टाकावे अशी विनंती केली आहे.