Gas Cylinder Delay Jawhar: पर्यटननगरी जव्हारला 45 दिवसांची गॅस प्रतीक्षा का? सिलिंडर वितरण 30 दिवसांवर आणण्याची मागणी

जव्हारमध्ये ग्राहकांना 45 दिवसांच्या अंतरानेच सिलेंडर मिळतो. मात्र जव्हार हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून शासनाने त्याला ‌‘ब‌’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे.
Gas Cylinder Delay Jawhar
Gas Cylinder Delay JawharPudhari
Published on
Updated on

जव्हार: राज्याच्या नकाशावर पर्यटननगरी म्हणून ओळख निर्माण केलेल्या जव्हार शहरातील नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरसाठी तब्बल 45 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी सध्याचा वितरण कालावधी कमी करून 30 दिवस करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ संजय साहाणे यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी, पालघर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Gas Cylinder Delay Jawhar
Kalyan Scooter Stunt: नातवाच्या स्टंटबाजीचा आजोबांना फटका; वाहतूक शाखेने ठोठावले 23 हजार 500 चे चलान

जव्हारमध्ये ग्राहकांना 45 दिवसांच्या अंतरानेच सिलेंडर मिळतो. मात्र जव्हार हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ असून शासनाने त्याला ‌‘ब‌’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या, पर्यटनामुळे वाढलेली वर्दळ आणि वाढत्या नागरी सुविधा लक्षात घेता गॅसची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.सध्याच्या वितरण व्यवस्थेमुळे अनेक कुटुंबांना गॅस संपल्यानंतर प्रतीक्षा करावी लागतेय.

वितरण कालावधी कमी करण्याची मागणी

जव्हारचा विचार ग्रामीण नव्हे तर विकसित होत असलेल्या शहरी क्षेत्राप्रमाणे करून गॅस वितरण कालावधी 30 दिवसांवर आणावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना वेळेत गॅस उपलब्ध होईल आणि वारंवार निर्माण होणारी अडचण दूर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Gas Cylinder Delay Jawhar
Kalyan Firing Case: व्हॉट्सॲपवर डीपी ठेवण्याच्या वादातून गोळीबार; मोहन्यातील प्रकार

जव्हारसारख्या पर्यटननगरीतील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या निवेदनाची प्रत तहसीलदार, जव्हार यांनाही पाठविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news