Palghar Diwali Sweets : दिवाळीच्या मिठाईमध्‍ये आढळली बुरशी

अर्ध्याहून जास्त मिठाई बॉक्समध्‍ये बुरशी असल्याचा आरोप
Palghar Diwali Sweets
Palghar Diwali Sweetspudhari photo
Published on: 
Updated on: 

जव्हार : दिवाळीच्या सणात आनंद व गोडवा वाटण्यासाठी ग्राहक मोठ्या विश्वासाने मिठाईची खरेदी करतात. मात्र, जव्हार शहरातील गांधी चौक येथील एका दुकानदाराने मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या मिठाईच्या बॉक्समध्ये बुरशी व खराब झालेली मिठाई आढळल्याचा गंभीर आरोप आहे. या धक्कादायक प्रकारामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून मिठाई विक्रीच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील आदिवासी समाजाचे शिक्षक अशोक तुंबडा यांनी दिवाळी निमित्त गावातील ग्रामस्थ व नागरिक, नातेवाईकांसाठी मिठाई वाटप करण्याकरिता, संबंधित दुकानातून ८० मिठाईचे बॉक्स खरेदी केले होते, परंतु मिठाचे बॉक्स वाटप करण्यापूर्वी मिठाईचे बॉक्स उघडून पाहिले असता, अर्ध्याहून अधिक बॉक्समधील मिठाईवर हिरवट-पांढरी बुरशी जमल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप केला आहे.

Palghar Diwali Sweets
Bhiwandi Illegal Warehouses : अनधिकृत गोदामांना संरक्षण देत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान

काही मिठाईतून दुर्गंधीही येत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांना वाटप करण्यासाठी आणलेल्या मिठाईच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, या प्रकारानंतर संबंधित ग्राहकाने मिठाई दुकानदाराकडे जाऊन जाब विचारला. मात्र यावेळी तेथील दुकानदाराने समाधानकारक उत्तर देण्याऐवजी उर्मट उत्तर दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दुकानदाराच्या या कथित बेजबाबदार भूमिकेमुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्‍यात येत आहे. आम्ही आदिवासी समाजातील सुशिक्षित शिक्षक आहोत तरी एवढी फसवणूक तर आमच्या आदिवासी माणसाचे काय? असा प्रश्न त्यांनी त्यावेळी केला, त्यामुळे त्यांनी खरेदी केलेली मिठाई बॉक्स दुकानासमोरच राग व्यक्त केला आहे.

Palghar Diwali Sweets
Panvel Karjat Railway Line : पनवेल -कर्जत रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात

गोरगरिब ग्रामस्थांना, दिवाळी निमित्ताने जव्हार शहरातील गांधी चौक येथील ‘बालाजी स्वीट्स’ दुकानातून ८० बॉक्स मिठाई घेतली होती; परंतु आम्हाला भेसळयुक्त, बुरशी लागलेली मिठाई दिली होती. आम्ही सर्व बॉक्स त्या दुकानदाराकडे देत विचारणा केली, मात्र यावेळी व्यवस्थित उत्तर मिळाले नाही, याकडे अन्न व औषधे प्रशासनाने लक्ष घालावे.

अशोक तुंबडा, ग्राहक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.