

जव्हार ः जव्हार एसटी शिवाय येथील प्रवाशांना एसटी बसशिवाय कुठलेही प्रवाशाचे साधन नाही, मात्र पहिल्याच दोन दिवसाच्या पाऊसात जव्हारचे एसटी बस स्थानक पहिल्याच पाऊसाने तुडूंब भरल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले असून ,बसस्थानकाला तळ्याचे स्वरुप आले आहे.
जव्हार आदिवासीबहुल व दुर्गम भागात एस.टी. बसस्थानक हे प्रवाशांसाठी केवळ प्रवासाचे साधन नसून दैनंदिन जीवनाशी निगडीत एक महत्त्वाचा आधार आहे. मात्र, पहिल्याच पाऊसात बसस्थानकात तुडुंब पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले झाले. प्रवाशांना दगडावर पाय ठेवून दुसर्या बाजूने जाण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. याकडे एसटी महामंडळाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील एसटी वाहतूक ही येथील ग्रामीण भागातील जीवन वाहिनी आहे, ग्रामीण भागातील वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी एसटी बस सेवा हीच एकमेव वाहतूचे साधन आहे, मात्र गेल्या दोन दिवसाच्या सततच्या पावसामुळे प्रवाशांचे हाल झाले, यामध्ये शाळा-कॉलेजला जाणार्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता यायला उशीर झाला, तर काही वेळा बस स्थानकात मोठे पाणी साचले होते त्यामुळे अपघात आणि आजार पसरण्याचा धोका आहे.
या समस्येवर उपाय म्हणून पाऊसाळयापूर्वी बसस्थानक परिसराचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण करणे, उंची वाढवण्याचे काम व्हायला हवे होते. ही कामे वेळेत न झाल्यामुळे यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. छत आणि प्रवाशांच्या थांबण्याच्या जागांची डागडुजी करणे, स्थानिक प्रशासनाने वारंवार तपासण्या करून आवश्यक सुधारणा करणे. याकडे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.