First Bullet Train: १५ ऑगस्ट २०२७ ला बुलेट ट्रेन धावणार; सुरत-बिलिमोरा मार्गावर पहिली सेवा सुरू करण्याचे लक्ष्य

देशातील पहिली बुलेट ट्रेन १५ ऑगस्ट २०२७ पासून सुरत-बिलिमोरा दरम्यान सुरू करण्याचे लक्ष्य आहे. मुंबई-अहमदाबाद मार्ग २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे संकेत रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत.
Bullet Train
Bullet TrainFile Photo File Photo
Published on: 
Updated on: 

पालघर: देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे स्वप्न साकार होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडत असले, तरी मुंबई आणि ठाणेकरांना या वेगवान प्रवासासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी १५ ऑगस्ट २०२७ पासून देशातील पहिली बुलेट ट्रेन सेवा सुरू करण्याचे लक्ष्य जाहीर केले आहे.

सुरुवातीला ही सेवा गुजरातमधील सुरत ते बिलिमोरा या मर्यादित टप्प्यावर धावणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने मार्गाचा विस्तार केला जाणार असून, मुंबई-अहमदाबाद मार्ग २०२९ पर्यंत पूर्ण करण्याचे संकेत रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत. ठाणे, विरार आणि बोईसर येथील स्थानकांवरून बुलेट ट्रेनने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

Bullet Train
Devendra Fadnavis Political Journey: १२ वर्षांचा राजकीय प्रवास! देवेंद्र फडणवीस यांनी किती वेळा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ?

मुंबई-अहमदाबाद हा ५०८ किलोमीटर लांबीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाणार आहे. या मार्गावर एकूण १२ स्थानके उभारली जात आहेत. पहिल्या टप्प्यात सुरत-बिलिमोरा, त्यानंतर वापी-सुरत आणि पुढे वापी-अहमदाबाद या मार्गावर सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

त्यानंतर अहमदाबाद-ठाणे आणि अखेरीस मुंबई-अहमदाबाद असा विस्तार केला जाणार आहे. म्हणजेच बुलेट ट्रेनची पहिली सेवा सुरू झाली तरी मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर येथील प्रवाशांना लगेच त्याचा लाभ मिळणार नाही. प्रकल्पाच्या कामाला वेग आला असला, तरी अद्याप मोठा टप्पा पूर्ण होणे बाकी आहे.

सप्टेंबर २०२६ मधील माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पाचे एकूण भौतिक काम ६२.१६ टक्के पूर्ण झाले आहे. सुमारे ४५९.९ किलोमीटर मार्गावरील पायाभरणीचे काम, ४५५.१ किलोमीटरचे खांब आणि ३६६ किलोमीटरच्या गर्डर उभारणी पूर्ण झाली

ठाणे खाडीखालून सात किलोमीटरचा बोगदा

या प्रकल्पातील सर्वाधिक चर्चेचा भाग म्हणजे ठाणे खाडीखालून जाणारा सुमारे सात किलोमीटर लांबीचा रेल्वे बोगदा. एकूण २१ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा हा भाग समुद्राखालील मार्गातून जाणार आहे.

Bullet Train
Maharashtra Fodder Prices: दुष्काळात पशुधनासाठी सरकारचा मोठा निर्णय; चाऱ्याचे दर निश्चित, जाणून घ्या नवे दर

मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील स्थानक जमिनीखाली सुमारे ३२ मीटर खोलीवर उभारले जात आहे. हे संपूर्ण मार्गावरील एकमेव भूमिगत स्थानक असेल. या स्थानकाला सहा फलाट असणार आहेत. ठाणे येथे बुलेट ट्रेनच्या गाड्यांच्या देखभालीसाठी स्वतंत्र डेपोही उभारला जात आहे.

ताशी ३२० किलोमीटर वेग; प्रवास अवघ्या दोन तासांत

बुलेट ट्रेनचा व्यावसायिक वेग ताशी ३२० किलोमीटर असेल. अधिकृत नियोजनानुसार, मुंबई-अहमदाबाद प्रवास सुमारे एक तास ५८ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. संपूर्ण मार्गावर १२ स्थानके असणार आहेत. महाराष्ट्रात मुंबई बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर, तर गुजरातमध्ये वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती ही स्थानके असतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.