

तलासरी : पोलिसांनी सीमा तपासणी नाका दापचरी जवळ नाका बंदी करून मुंबई अहमदाबाद महामार्गावर मुंबई बाजू कडे जाणारा अवैध गुटखा, सुगंधी पान मसल्याने भरलेले दोन कंटेनरवर कारवाई करत पकडण्यात आले. पालघर पोलीस अधीक्षक यतीन देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
कारवाईत 1 कोटी 78 लाख 6 हजार 248 रुपये किंमतीचा गुटखासह दोन कंटेनर वाहन असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावेळी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा भरून दोन कंटेनर वाहन गुजरात बाजू कडून मुंबईला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर दापचरी सीमा तपासणी नाक्याजवळ नाकाबंदी करून मुंबईकडे जाणारे दोन कंटेनर या वाहनाना थांबून झाडाझडती आणि तपासणी केली असता त्यामध्ये भाताच्या तुसाने भरलेल्या गोणीच्या मागे गुटखा भरलेल्या गोण्या आढळून आल्या.
1कोटी 78 लाख 6 हजार 248 रुपये किंमतीचा सुगंधी पान मसाला आणि अवैध गुटखासह वाहने असा एकूण मुद्देमाल असून महामार्गाने गुटखा तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत महाराष्ट्रात गुटखा तस्करी होत असल्याचे यावरून समोर आले आहे.
याबाबत तलासरी पोलिसांनी कारवाई करत गुटख्यासह दोन कंटेनर वाहने असा एकूण 1 कोटी 78 लाख 6 हजार हजार 248 रुपयाचा किंमतीचा मुद्देमाल जप्त करून इफ्ते कार हबीब शेख ( 42) अक्षय सातपुते (29) या दोन आरोपींना अटक करून तलासरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.