LPG gas tanker accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एलएनजी गॅस टँकर पलटी; स्थानिक रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना

पोलीस आणि गॅस कंपनीच्या पथकाकडून उपाययोजना सुरु
LPG gas tanker accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर एलएनजी गॅस टँकर पलटी; स्थानिक रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना
Published on
Updated on

तलासरी: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरीनजीक असलेल्या सावरोली गावाच्या हद्दीत आज पहाटे चार वाजेच्या सुमारास एलएनजी (द्रवीकृत नैसर्गिक वायू) गॅस वाहून नेणारा एक महाकाय टँकर पलटी झाल्याची भीषण दुर्घटना घडली. टँकर महामार्गावरून खाली घसरल्याने गॅस गळतीचा आणि सुरक्षेचा मोठा धोका निर्माण झाला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व आपत्कालीन यंत्रणांसह पोलीस आणि गॅस कंपनीचे तांत्रिक पथक युद्धपातळीवर उपाययोजना करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर एलएनजी गॅस टँकर पहाटे चारच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर सावरोली हद्दीतून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाले.

वाहन चालक नसेत असताना अंधारात सावरोली उड्डाण पुलाजवळ नियंत्रण सुटल्याने हा अवजड टँकर क्रमांक (एल एन 02 ए ए 1401) महामार्गाच्या कडेला असलेल्या भागात जाऊन थेट डाव्या बाजूला उलटला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी तैनात असून तलासरी पोलीस, महामार्ग पोलीस, डहाणू आणि सरीगाम अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तसेच एनएचएआय (NHAI) हायवे पेट्रोलिंग टीम आणि ॲम्बुलन्स देखील सुरक्षेसाठी सज्ज ठेवण्यात आली आहे. एलएनजी गॅसचा धोका लक्षात घेता संपूर्ण परिसराला सुरक्षा दोरीने (कॉर्डन लाईन) वेढण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून तत्काल केमिकल तज्ञाना पाचारण करण्यात आले तसेच दुर्घटनाग्रस्त अँकरच्या 100 मीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात असून परिसर बंद करण्यात आला आहे.

पोलीस व गॅस कंपनीकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत अपघाताच्या अनुषंगाने महामार्ग पोलिस तलासरी पोलिस आणि गुजरात एनर्जी लिमिटेडचे डेप्युटी मॅनेजर ब्रिज पटेल यांच्यासह सेफ्टी ऑफिसर व तांत्रिक पथकाने अपघात स्थळाच्या आजूबाजूच्या रहिवासी भागात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला.या पथकाने स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना अपघाताबाबतची संपूर्ण कल्पना दिली. एलएनजी गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी, जसे की उघड्यावर शेकोटी किंवा आग न पेटवणे, या बाबत नागरिकांना योग्य त्या महत्त्वपूर्ण सूचना दिल्या जात असून सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस आणि प्रशासनाकडून पुढील योग्य त्या सर्व उपाययोजना केल्या जात असून परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवले जात आहे.

महामार्गावरील दुर्घटनाग्रस्त गॅस टँकर मधील गॅस तज्ञांच्या मदतीने दुसऱ्या टँकर मध्ये भरण्याचे (रिफील) करण्याचे काम सुरू केले असून त्याला सुमारे सहा ते सात तास लागण्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news