

पालघर जिल्हयातील बहुतांश जंगल वन विभागाच्या जव्हार विभागात अस्तित्वात असून अनेक वर्षांपासून येथील जंगलांवर कुल्हाड चालविली गेल्याने त्याचा थेट परिणाम वातावरणावर देखील होताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मालकी क्षेत्रातील वृक्षतोड हा खरेतर गोरगरिब शेतकऱ्यांना दिलेला अधिकार आहे मात्र वन विभागाने त्यावर कडक निर्बंध लादल्याने जव्हार उप संरक्षकांची तक्रार थेट पालघरचे पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे.
पालघर जिल्हयातील जव्हार वन विभागाच्या अखत्यारीत मोठे जंगल अस्तित्वात असून अलीकडच्या काळात बेसुमार खाजगी वृक्षतोड व चोरटी जंगल तोड यांमुळे हिरवळ संकटात सापडली आहे. मालकी क्षेत्रात वृक्षतोड करून आपला उदरनिर्वाह तसेच आर्थिक विवंचना रोखता यावी यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. खाजगी क्षेत्रातील वृक्षांची तोड करून विक्री करता यावी यासाठी प्रकरण बनवून, वृक्षांचा रीतसर पंचनामा करून वन विभाग त्यासाठी सहकार्य व परवानगी देते. जव्हार उप संरक्षक डॉ. सैफुन शेख यांनी मात्र या प्रक्रियेत होणाऱ्या चालबाजीला लगाम घालून काटेकोर अंमलबजावनी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे.
जव्हार विभागात खरेतर मालकी क्षेत्रातील वृक्षतोड हा नेहमीचं वादाचा विषय असून बहुतांश खातेदार स्वतः मालकी प्रकरण न बनविता कंत्राटदारांच्या मार्फत कागदीघोडे नाचवून तोड व वाहतूक करून घेतात. अनेकदा कंत्राटदार प्रकरण न बनविता अवैधरित्या तोड करतात तर अगदी राखीव वनात देखील वृक्षतोड झाल्याची कित्येक उदाहरणे आहेत.
वाडा व विक्रमगड तालुक्यात तर काही कंत्राटदारांनी अक्षरशः धुमाकुळ घातला असून हिरवे झाडं काही दिवसांत फक्त चित्रात बघावे लागेल का अशी लोकांना भीती वाटत आहे. उप वनसंरक्षक डॉ. सैफुन शेख हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी जव्हारचा पदभार स्विकारल्यापासून तस्करांचे धाबे दणाणले आहेत. अनेक मोठ्या कारवाया त्यांच्या मार्गदर्शनाने घडल्या असून जंगल रक्षणासाठी ते रीतसर पंचनामा करून वन विभाग त्यासाठी अतिशय तत्पर असल्याची अनेक उदाहरणे आहेत.
सहकार्य व परवानगी देते. जव्हार उप संरक्षक डॉ. सैफुन शेख यांनी मात्र या प्रक्रियेत होणाऱ्या चालबाजीला लगाम घालून काटेकोर अंमलबजावनी करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. जव्हार विभागात खरेतर मालकी अधिकृत खाजगी मालकी प्रकरणांना त्यांचा कोणताही विरोध नाही मात्र त्यासाठी शासनाने आखून दिलेल्या कागदांची काटेकोर अंमलबजावनी व्हावी असा त्यांचा उद्देश आहे असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगत आरोपांचे खंडन केले आहे.
जव्हार वन विभागात जंगलाचे मोठे क्षेत्र असून वन्यजीव व वन विकास महामंडळ अशी अन्य यंत्रणा येथे कार्यरत आहे. खैर व साग या मौल्यवान वृक्षांची तस्करांनी विल्हेवाट लावली असून काहि केल्या या प्रजातीची तस्करी थांबायला तयार नाही. शिवबाला, अमित मिश्रा तसेच आता कार्यरत असलेल्या डॉ. सैपून शेख यांसारख्या धडेकाबाज उप वनसंरक्षकाची जव्हार सारख्या जंगलाला गरज असून तरच येथील निसर्गसौंदर्य व हिरवळ अबाधित राहील असे लोकांचे म्हणणे आहे.